Weight loss Tips : बिघडलेली जीवनशैली (lifestyle)आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल बहुसंख्य लोकांना वाढत्या वजनाची (weight gain) समस्या भेडसावू लागली आहे. हे वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. डाएट, जिममध्ये जाऊन घाम गाळत केलेला व्यायाम, भरपूर चालणे असे अनेक मार्ग अवलंबले जातात. वजन कमी करण्याचा विचार चांगला असला तरी त्यासाठी डाएट करण्याच्या नादात लोकं अनेक पोषक तत्वे, अन्नपदार्थ खाणं टाळतात. डाएटमुळे वजन तर कमी होतं पण पोषणाअभावी त्या व्यक्तीचे नुकसान कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्या व्यक्ती आजारी पडतात. योग्य मार्गाने आणि चांगले जेवण जेऊनही वजन कमी करता येते. रोजच्या आहारात जांभूळाचा (Jamun) समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी कण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता, पण तुम्हाला माहीत आहे का, की रोज जांभूळ खाऊनही वजन कमी होऊ शकते. रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 5-6 जांभळं जरूर खावीत. ती आरोग्यासाठी तर चांगली असतातच पण वजन घटवण्यातही त्यांचा उपयोग होतो.
जर तुम्हाला अख्खे जांभूळ खायची इच्छा नसेल, तर तुम्ही त्यांचा ज्यूसही पिऊ शकता. दिवसभरात कधीही एक ग्लास जांभळाचा रस प्यावा. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि बराच काळ तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही फूड क्रेव्हिंगपासूनही वाचता.
आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या जांभळात खूप पोषक तत्वे असतात. तुम्ही जांभळाची स्मूदीही ट्राय करू शकता. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि एनर्जेटिक वाटेल. तसेच जांभूळामुळे मधुमेहासारखे आजारही तुमच्यापासून दूर राहतील. मात्र ही स्मूदी बनवताना जांभूळातील बिया अवश्य काढा. तुम्ही दुधासोबतही त्याचे सेवन करू शकता. स्मूदीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडा बर्फ घालून गारेगार स्मूदीचा आस्वाद घेऊ शकता.
मधुमेह दूर ठेवायचा असेल तर आहारात जांभूळ पावडरीचा नेहमी वापर करा. मधुमेहासारख्या आजारात जांभूळ पावडर औषध म्हणून काम करते. तसेच त्याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. कडक उन्हात जांभूळ वाळवून त्याची पावडर बनवा. आणि रोज सकाळी गरम पाण्यात एक चमचा पावडर घालून ते पाणी प्या. काही दिवसांतच अपेक्षित परिणाम दिसून येईल.