Dark circles : डोळयाभोवतीची काळी वर्तुळं करा दूर, जाणून घ्या आरोग्यविषयक खास टिप्स

| Updated on: Jun 09, 2022 | 9:33 AM

डार्क सर्कल दूर करा: काळी वर्तुळाच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर हे पदार्थ खा. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. यामुळे काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.

Dark circles : डोळयाभोवतीची काळी वर्तुळं करा दूर, जाणून घ्या आरोग्यविषयक खास टिप्स
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : पुरेशी झोप न होणे, प्रथिनांची कमतरता अशा विविध कारणांमुळे अनेकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark circles under the eyes) येतात. ही समस्या सामान्य आहे. बऱ्याच वेळा डोळ्यांखाली काळी वर्तुळे जास्त वेळ स्क्रीन पाहणे, नीट झोप न लागणे, ताणतणाव, अस्वस्थ आहार आणि खराब जीवनशैलीमुळे होतात. त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी, लोक अनेक सप्लिमेंट्स आणि क्रीम्सचा अवलंब करतात. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. अशा स्थितीत निरोगी जिवनशैली (Healthy lifestyle) असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आहारात विविध आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करू शकता जे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून संरक्षण करण्यासाठी काम करतील. डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी, तुमच्या रोजच्या आहारात (In the daily diet) तुम्ही कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश केल्यास तुम्हाला फायदा होईल याबाबत तुम्हाला माहिती असायला हवे. कोणत्या पदार्थाचे सेवन केल्याने, काळी वर्तुळे कमी होऊ शकतात याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

टरबूज

हे अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. ते पाण्याने भरलेले आहे. त्यात जवळपास ९० टक्के पाणी असते. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन बी 1, बी 6 आणि सी तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असतात. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. त्यात बीटा कॅरोटीनसह अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. डोळ्यांसाठी ते फायदेशीर आहे.

हे सुद्धा वाचा

पपई

पपईमध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. या फळामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचा काळेपणा दूर होण्यास मदत होते. त्यात मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते. हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. हे काळी वर्तुळे दूर करण्यास आणि त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करते.

पालेभाज्यांची कोशिंबीर

पालेभाज्यांचा वापर करून तयार केलेली कोशिंबीर रोजच्या आहारात समाविष्ट करा. तुम्ही त्याचा आहारात समावेश केल्याचे अनेक फायदे आहेत. पालेभाज्यात जवळपास ९० टक्के पाणी असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. डोळ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

टोमॅटो

टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर अन्न आहे. टोमॅटो त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करतो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन असते. हे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून बचाव करण्याचे काम करते.

काकडी

काकडी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. काकडीचे सेवन केल्याने कोलेजन निर्मितीला चालना मिळते आणि त्वचा चमकदार होते. काकडीमध्ये के, ए, ई आणि सी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

संत्रा

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही कोलेजन वाढवण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. हे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून बचाव करण्याचे काम करते.