नवी दिल्ली – प्रत्येकाला वाटत असते की आपण दीर्घायुषी व्हावे, त्यासाठी प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने सजग असतो आणि प्रयत्नही करीत असतो. सध्याच्या वयोमानाची आकडेवारी पाहिली तर, भारतात पुरुषांचे (Male) सरासरी वय हे 69.5 वर्ष आहे, तर महिलांचे (Female)वय 72.2वर्ष इतके आहे. ह्रद्याशी संबंधित आजार, फुफुस्सांचे आजार, स्ट्रोक, मधुमेह यासारख्या किमान 50 असे आजार (decease)आहेत, ज्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते. तुम्ही मृत्यूला लवकर निमंत्रण देऊ शकता. काही पौष्टिक पदार्थांचा अन्नात समावेश असेल तर तुमचे वय वाढू शकते. पण त्याचबरोबर जर तुमच्या अन्नात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश नसेल तर तुमचे आयुष्य तुम्हीत झपाट्याने कमी करुन घ्याल. तुम्हाला नक्कीच तुमचे आयुष्य वाढावे असेच वाटत असणार, तर हे नक्की वाचाच.
मिशिगन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी खाण्याच्या काही वस्तूंबाबत संशधन केले. या खाद्य पदार्थांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर काय परिणाम होतो, याचा त्यांनी अभ्यास केला. त्यासाठी संशोधनही केले. त्यात त्यांच्या लक्षात आले की असे काही अन्नपदार्थ आहेत, ज्यांचे एकदाही सेवन केले तरी त्याचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या काळावर होऊ शकतो. उदाहरणआर्थ जर तुम्ही एक हॉटडॉग खाल्ले तर तुमचे आयुष्य 36 मिनिटांनी कमी होऊ शकते. यासोबत आणखीही काही असे तुमच्या खाण्यातील दैनंदिन खास्दय पदार्थ आहेत, ज्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते.
असेही काही पदार्थ आहेत, ज्यांचा समावेश जर तुम्ही तुमच्या आहारात केलात, तर तुमचे आयुष्य वाढू शकेल. त्यामुळे या रिसर्चमुधून आपल्याला आपल्या दैनंदिन आहारातील अनेक पदार्थ तातडीने बदलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. आता पाहुयत काय खाल्ले तर आयुष्य वाढेल.
नेचर फूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, हा अभ्यास जगण्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक आहे. या अभ्यासात संशोधकांनी सुमारे सहा हजार वेगवेगळे पदार्थ त्यात नाश्ता, जेवण आणि पेय यांचा अभ्यास केला. या संशोधनातून अनेकांना त्यांच्या प्रकृतीविषयी जागरुकता येईल आणि त्यानुसार ते त्यांच्या आहारात बदल करतील, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जगण्यात फास्ट फूडच्या जमान्यात सगळ्यांनीच त्यांच्या आहारात बदल करण्याची गरजही, संशोधकांनी व्यक्त केली आहे.