हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणाऱ्या पदार्थांची मागणी वाढते. हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी खजूर उत्तम पर्याय आहे. खजूर केवळ शरीराला उबदार ठेवत नाही तर आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असतात ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. विशेषतः हिवाळ्याच्या काळात खजूर खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
बद्धकोष्ठते पासून आराम
खजूर मध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
थोडे खजूर खाल्ल्याने देखील पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि यामुळे वजन नियंत्रणात राहते.
लोह
खजूर मध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते विशेषतः ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते
खजूर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
सांधेदुखी
खजूर मध्ये असलेले मॅग्नेशियम आणि दाहक विरोधी गुणधर्म सांधेदुखी आणि सूज यापासून आराम देतात.
सकाळी रिकाम्या पोटी
रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते. दिवसाची सुरुवात चांगली करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
दुधासोबत
हिवाळ्यात दुधात खजूर मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर आतून उबदार राहते.
तुपासोबत
वजन वाढवायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुपा सोबत खजूर खा. हे शरीराला निरोगी पद्धतीने वजन वाढण्यास मदत करते.
रात्रभर खजूर भिजवा
खजूर रात्रभर पाण्यात भिजवल्याने ते सहज पचतात आणि त्याचे फायदे देखील दुप्पट होतात.
आपल्या आहारात खजूर समाविष्ट करताना हे लक्षात ठेवा की ते मर्यादित प्रमाणातच सेवन करा. कारण जास्त खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच खजुराचे सेवन करावे.
(टिप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)