देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत 1 जुलैपासून सिंगल युज प्लास्टिकवर (Ban on Single use Plastic) बंदी घातली आहे. प्लास्टिकच्या सामानावर बंदी घालण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत, मात्र त्यात संपूर्णपणे यश येत नाही. प्लास्टिकचा वापर केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. 1 जुलैपासून पातळ पिशव्यांसह सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र प्लास्टिकचे डबे, प्लेट्स ( Plastic Tiffin, Bottle)यामध्ये जेवण गरम करून (hot food)खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरते. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न ठेवल्यास प्लास्टिकमधील काही केमिकल्स आपल्या जेवणात मिसळू शकतात, असे रिसर्चमधून समोर आले आहे. हे केमिकल्स डोळ्यांना दिसत नसले तरी ते हळूहळू आपल्या शरीराचे नुकसान करतात. प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जाणारे पदार्थ किती गरम आहेत, यावरून खाद्यपदार्थ किंवा पाण्यात किती केमिकल्स मिसळली हे समजतं. खूप गरम अन्न प्लास्टिकच्या भांड्यात ठेवल्यास अन्नात जास्त केमिकल्स मिसळतात.
प्लास्टिकमध्ये वेगवेगळ्या केमिकलचे मिश्रण असते, मात्र ‘एंडोक्रिन डिस्ट्रक्टिंग’ हे केमिकल सर्वात विषारी असते. या केमिकलमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यांच्या कार्यावर परिणाम होतो. सतत प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जेवण गरम केल्यास त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. परिणामी मृत्यूही ओढवू शकतो. मात्र ही केमिकल्स प्लास्टिकमध्ये पहिल्यापासून नसतात, तर त्यामध्ये गरम अन्न ठेवल्यानंतर ती केमिकल्स तयार होतात.
आपण जेवण वा पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकचा डबा किंवा बाटली वापरतो, मात्र त्याची क्वॉलिटी चांगली आहे की नाही हे तपासणेही गरजेचे आहे. प्लास्टिकचा डबा वा बाटलीच्या मागे ISI लिहिले असेल किंवा एक चिन्ह असणे जरूरी आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅडंर्ड (BIS)द्वारे हे जारी केले जाते व त्यावरून प्लास्टिकचा डबा वा बाटलीच्या क्वॉलिटीची खात्री होते.
पॉलीप्रोपायलीन (PP)ने बनलेले प्लास्टिक, ज्याद्वारे बॉटल कॅप, स्ट्रॉ, योगर्ट कंटनेर, प्लास्टिक प्रेशर पाइप इत्यादी वस्तू बनतात. केमिकल रेझिस्टंस हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हे फर्स्ट एड प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगसाठीही वापरले जाते.
पाण्याची बाटली गरम होऊ देऊ नका. रणरणत्या उन्हात कारमध्ये प्लास्टिकची पाण्याची बाटली ठेवून बाहेर जाऊ नका. बाटली गरम झाल्यास त्यातील केमिकल्स पाण्यात मिसळू शकतात. प्लास्टिकच्या पिशवीत चहा घेऊ नका. लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजू नका. प्लास्टिकची बाटली मायक्रोव्हेवमध्ये किंवा गॅसवर गरम करू नका.