रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते हृदय स्वस्थ ठेवण्यापर्यंत…. डाळिंब खाण्याचे अनेक फायदे !

| Updated on: Sep 12, 2022 | 4:59 PM

डाळिंब हे एक चविष्ट फळ आहे. डाळिंबाच्या रसाचे नियमितपणे सेवन करणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामध्ये अनेक पोषक तत्वं असतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते हृदय स्वस्थ ठेवण्यापर्यंत.... डाळिंब खाण्याचे अनेक फायदे !
डाळिंब खाण्याचे अनेक फायदे
Follow us on

डाळिंब (Pomegranate) हे एक अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. त्याचा रसही खूप स्वादिष्ट असतो. आपण डाळिंबाचे सेवन त्याच्या ज्यूसच्या (juice) माध्यमातून किंवा सलाडमधूनही करू शकतो. या फळामध्ये अनेक पोषक तत्वे (many nutrition) असतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, मिनरल आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्वे आरोग्यासाठी खूप लाभदायक (beneficial for health) असतात.

कोलेस्ट्रॉल कमी करणे, वजन कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळणे असे अनेक फायदे डाळिंब खाल्ल्याने होतात. डाळिंबामध्ये अनेक ॲंटी-इन्फ्लेमेटरी व ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जाणून घेऊया डाळिंबाचे आणखी काही फायदे.

सूज कमी होते

डाळिंबामध्ये ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. तसेच ॲंटी-ऑक्सीडेंट गुणही असतात. ज्यामुळे शरीरातील एखाद्या भागातील सूज कमी होण्यास मदत होते. डाळिंब हृदय रोग, कॅन्सर, टाइप-2 मधुमेह आणि अल्झायमर यांसारख्या आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करण्याचे कार्य करते.

हे सुद्धा वाचा

हदय निरोगी ठेवते

डाळिंबामध्ये पॉलिफेनोलिक नावाचे तत्व असते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. डाळिंबाचा रस ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज कमी करण्यास मदत करतो.

यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. डाळिंब हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या समस्येपासून मुक्त करते.

भरपूर ॲंटी-ऑक्सीडेंट असतात

डाळिंबामध्ये भरपूर ॲंटी-ऑक्सीडेंट असतात. फ्री रॅडिकल्समुळे जे नुकसान होते, त्यापासून हे गुणधर्म आपल्याला वाचवण्यात मदत करतात. अँटीऑक्सिडंट्सयुक्त अशा या फळाचा आहारात समावेश केल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो.

सांधेदुखीपासून बचाव करते

डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे सांधेदुखीची समस्या दूर करण्याचे काम करते. तसेच संधिवात रोखण्यास मदत करते.

स्मरणशक्ती सुधारते

डाळिंबाचा रस अतिशय चविष्ट असतो. त्याचे नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते. डाळिंब खाल्याने अल्झायमरही रोखता येतो. तसेच आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली व्हावी, यासाठीही डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते.

पचनास मदत करते

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फायबर खूप चांगले आहे. डाळिंबात फायबर मोठ्या प्रमाणात असते. आपण आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकता.

डाळिंबाचे सेवन केल्याने, आपण पचनाच्या समस्यांपासून स्वत: चे संरक्षण करण्यास सक्षम ठरता. डाळिंबाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. हे आपल्याला अनेक रोग आणि संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करू शकते.

(टीप – या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)