Research | मांसाहारी आणि शाकाहारी मुलांची समान वाढ, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!

| Updated on: May 09, 2022 | 9:42 AM

संशोधनाचे निष्कर्ष पेडियाट्रिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधकांना असेही आढळून आले की शाकाहारी मुलांचे आणि मांसाहारी मुलाचे वजन एकसारखेच आहे. कॅनडामधील वनस्पती आधारित आहाराचे सेवन करण्याकडे बदल म्हणून हे निष्कर्ष आले आहेत.

Research | मांसाहारी आणि शाकाहारी मुलांची समान वाढ, वाचा संशोधनातून नेमके काय पुढे आले!
Image Credit source: tufts.edu
Follow us on

नुकताच एक संशोधन (Research) लहान मुलांवर करण्यात आले आहे. यामध्ये काही शाकाहारी मुले तर काही मांसाहारी मुले संशोधनासाठी घेण्यात आली. शाकाहारी मुलांना सतत काही दिवस शाकाहारी जेवण दिले गेले तर मांसाहारी मुलांना नाॅनव्हेज खायला दिले. या संशोधनातून समोर आले की, शाकाहारी आणि मांसाहारी (Vegetarian and non-vegetarian) मुलांमध्ये समान वाढ दिसून आली. कारण आपल्याकडे असे म्हटंले जाते की, शाकाहारी मुलांना मांसाहारी मुलांन इतके पोषण घटक (Nutritional components) त्यांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे शाकाराही मुलांची वाढ ही कमी होते. मात्र, या नवीन संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, शाकाहारी आणि मांसाहारी मुलांची वाढ ही समान पध्दतीनेच झाली आहे.

बघा संशोधनामध्ये नेमके काय म्हटंले आहे!

संशोधनाचे निष्कर्ष पेडियाट्रिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधकांना असे आढळून आले की शाकाहारी मुलांचे आणि मांसाहारी मुलाचे वजन एकसारखेच आहे. कॅनडामधील वनस्पती आधारित आहाराचे सेवन करण्याकडे बदल म्हणून हे निष्कर्ष आले आहेत. साधारण 2019 मध्ये कॅनडाच्या फूड गाईडच्या अपडेटने कॅनेडियन लोकांना मांसाऐवजी बीन्स आणि टोफू सारख्या वनस्पती आधारित प्रथिने असलेले डाएट फाॅलो करण्यास सुरूवात केली.

शाकाहारी मुलांचे BMI नुसार वजन योग्य

संशोधकांना असे आढळून आले की, ज्या मुलांनी शाकाहारी आहार घेतला त्यांचा BMI, उंची, लोह, व्हिटॅमिन डी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत समान आहे. शाकाहारी आहार घेणाऱ्या मुलांचे वजन कमी असण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते. मात्र, याचदरम्यान शाकाहारी अन्न घेतल्याने त्यांचे वजन कमी किंवा लठ्ठपणा वाढला असे संशोधनामध्ये अजिबात दिसले नाही. कमी वजन हे कुपोषणाचे सूचक आहे आणि हे लक्षण असू शकते की मुलाच्या आहाराची गुणवत्ता सामान्य वाढीसाठी मुलाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करत नाही. यासंदर्भात aninews ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.