वेगवेगळ्या अभ्यासातून असे दिसून आले की पुरूषांपेक्षा महिलांमध्ये कॅन्सरचे (Cervical Cancer) प्रमाण अधिक दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर महिलांमध्ये सर्व्हाइकल कॅन्सरचे (Cervical Cancer) प्रमाण अधिक आहे. सर्व्हाइकल कॅन्सरपासून सुरक्षा आणि उपचार दोन्ही शक्य आहे. पण या आजाराविषयी महिला अनभिज्ञ असल्याने आपल्याला कॅन्सर झाला हे समजत नाही. काही रिपोर्टनुसार सर्व्हाइकल कॅन्सरपासून बचावासाठी लसीकरण (Vaccination) हवे. लसीकरणासाठी जनजागृती आणि नियमित स्क्रीनिंग आवश्यक आहे. जसे सर्व्हाइकल कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा कॅन्सर सर्विक्सच्या कोशिकांवर परिणाम करतो. सर्विक्स युट्रेसच्या खालच्या भागात वेजाइनाला जोडून असतो. सर्व्हाइकल कॅन्सर याच कोशिकांना नुकसान पोचवतो. अनेक अभ्यासामध्ये हे दिसून आले की, कॅन्सर ह्युमन पँपिलोमा व्हायरसच्या ( एचपीव्ही) वेगवेगळ्या एचपीव्ही स्ट्रेन्समुळे होण्याचा शक्यता अधिक असते. प्राथमिक स्तरावर अंदाज येत नाही रिपोर्टनुसार सर्व्हाइकल कँन्सर प्राथमिक स्तरावर समजू शकतो. हा कँन्सर 10 ते 15 वर्षे प्री-कॅन्सरस स्टेजवर असतो. याचे पँप स्मियर सारखी सामान्य तपासणीतून माहिती होऊ शकते. त्यामुळे 30 वर्षांनंतर महिलांनी एचआयव्ही टेस्ट केली पाहिजे.
काय आहेत सर्व्हाइकल कँन्सरचे कारण?
सर्व्हाइकल कॅन्सरमध्ये हाय रिस्क ह्युमन पँपिलोमा व्हायरसचे एक प्रकार असतो. जर महिला या एचपीवीच्या संपर्कात आल्या तर तिच्या शरीराच्या इम्यून सिस्टीमवर परिणाम पडतो. काही महिलांचे इम्यून सिस्टीम या व्हायरसला रोखू शकत नाही. जर जास्त वेळ गेला आणि हाय रिस्क एचपीवीच्या संपर्कात राहला तर कॅन्सरचा धोका जास्त वाढतो. तरीही सुरुवातीला या कॅन्सरची लक्षणे दिसून येत नाही. याची लक्षण चटकन लक्षात येत नाही. लक्षण खूप जास्त वाढल्यावरच धोका लक्षात येतो. त्यामुळे वेळच्या वेळी तपासणी करत रहा. मासिक पाळीत अनियमित असणे, मासिक पाळी शिवाय रक्त जाणे, फिजिकल झाल्यावर रक्तस्राव होणे आदी सर्व्हाइकल कॅन्सरची लक्षणे असू शकतात. सर्व्हाइकल कॅन्सरच्या धोक्याला कमी करण्यासाठी एचपीवीच्या बचावापासून लस घेतली पाहिजे. अर्थात लस घेतल्यानंतरही नियमित स्क्रिनिंग हवे. त्यामुळे या कँन्सरसाठी महिलांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे.
टीप-कुठलेही उपचार किंवा औषधे घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.