Marathi News Health Excessive consumption of these spices in summer is harmful to health
Spices : उन्हाळ्यात या मसाल्यांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक, वाचा हे नेमके कोणते मसाले?
कढी, वरण आणि भाज्यांमध्ये विविध भारतीय मसाले (Spices) वापरले जातात. जोपर्यंत भाज्यांमध्ये मसाले पडत नाहीत तोपर्यंत भाज्यांमध्ये चव आणि स्वाद येत नाही. मसाले जेवणाची चव वाढवतात. हे मसाले आरोग्यासाठीही (Health) खूप जास्त फायदेशीर असतात. ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. पण यातील बरेच मसाले असे असतात की ते उन्हाळ्यात वापरू नयेत.
उन्हाळ्यात मसाल्यांचा अति वापर टाळा.
Image Credit source: TV9
Follow us on
मुंबई : कढी, वरण आणि भाज्यांमध्ये विविध भारतीय मसाले (Spices) वापरले जातात. जोपर्यंत भाज्यांमध्ये मसाले पडत नाहीत तोपर्यंत भाज्यांमध्ये चव आणि स्वाद येत नाही. मसाले जेवणाची चव वाढवतात. हे मसाले आरोग्यासाठीही (Health) खूप जास्त फायदेशीर असतात. ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. पण यातील बरेच मसाले असे असतात की ते उन्हाळ्यात वापरू नयेत. हे मसाले खूप गरम असतात. ते शरीरात उष्णता (Heat) निर्माण करू शकतात. उन्हाळ्यात त्यांचा अतिवापर केल्यास शरीराला हानी पोहोचते. ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. जाणून घेऊयात हे नेमके कोणते मसाले आहेत.
लाल मिरची
उन्हाळ्यात लाल मिरचीचे अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवते. हा खूप गरम मसाला आहे, यामुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे पोटात आणि छातीत जळजळ होऊ शकते, म्हणून ते कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जर आपण या हंगामामध्ये लाल मिरचीचे अधिक सेवन केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही आणि पोटासाठी हानिकारक आहे.
आले
चहा जवळपास सर्वांनाच प्यायला आवडतो, विशेष: आल्याचा चहा. पण उन्हाळ्यात त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते, त्याचा परिणाम खूप गरम असतो. याचे सेवन केल्याने जास्त घाम येतो. ज्यांना मधुमेह आणि रक्तस्त्रावाचे विकार आहेत त्यांनी त्याचे सेवन टाळावे. उन्हाळ्यात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
लसण
लसण खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लसणाचे सेवन कमी करावे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. याचे जास्त सेवन केल्याने दुर्गंधी, ऍसिड रिफ्लक्स आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका देखील वाढू शकतो. हिवाळ्यात लसणाचे अनेक फायदे आहेत पण उन्हाळ्यात ते टाळावे.
काळी मिरी
काळी मिरी हा एक गरम मसाला आहे. त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हे काही औषधांचा प्रभाव देखील कमी करू शकते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये काळी मिरीचे अजिबात सेवन करू नका. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकता.
पुदिना
पुदिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पुदीना खूप थंड आहे. हे माउथ फ्रेशनर म्हणूनही वापरले जाते. हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. हे अपचन, छातीत दुखणे, उन्हात जळलेली त्वचा आणि छातीत जळजळ दूर करण्यास मदत करते. मात्र, याचे प्रमाणामध्येच सेवन करा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)