नवी दिल्ली: ‘झिरोधा’ (Zerodha) या वित्तीय सेवा कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड (covid) साथीच्या काळात त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले होते. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी झिरोधाचे प्रमुख नितीन कामत यांच्या नव्या उपक्रमानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यायामाच्या खेळांसाठी (exercise sports activity) वेळ देणं हे एक आव्हानच ठरलं आहे. ट्विटरवरील (twitter) त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या ॲक्टिव्हिटीजचा ट्रॅक ठेवणे हा एक उत्तम मार्ग आहे. स्वत:च्या वजनावर लक्ष ठेवल्याने आहाराबाबतही माहिती मिळते, असेही त्यांनी नमूद केले. 2020 मध्ये आपल्या ॲक्टिव्हिटीजचा ट्रॅक ठेवण्यास सुरुवात करणाऱ्या कामत यांनी यावर्षी सप्टेंबरमध्ये आपले दैनंदिन लक्ष्य 1,000 कॅलरीजपर्यंत वाढवले आहे.
अपोलो हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मुकेश गोयल यांनी टीव्ही9 ला सांगितले की, वजन आणि कॅलरी बर्न यांच्यात एक दुवा आहे. कॅलरी बर्न करणे हे शारीरिक हालचालींच्या अथवा ॲक्टिव्हिटीच्या तीव्रतेवर आणि ती किती काळ केली जाते, यावर अवलंबून असते.
काम करत असताना तुम्ही साधा – सोपा व्यायाम करू शकता. उदा- सतत बसून न राहता खुर्चीवरून उठून ब्रेक घेणे आणि फिरणे, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे, बराच काळ बसून राहण्यापेक्षा थोडा वेळं उभे राहणे आणि चिप्स किंवा जंक फूड खाण्यापेक्षा पौष्टिक पदार्थ खाणे, असे उपाय तुम्ही करू शकता, असे त्यांनी सांगितले.
डॉ. गोयल यांच्या सांगण्यानुसार, काम करताना त्या दरम्यान फिटनेस राखण्यासाठी हे काही उपाय एका दिवसात मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करण्यास आणि निरोगी राहण्यास उपयुक्त ठरू शकतात.
प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायामाचं प्रमाण वेगवेगळं असतं. अति व्यायाम हा त्या व्यक्तीच्या फिटनेस लेव्हलवर अवलंबून असतो. एखादा अॅथलीट जो व्यायाम करतो, तो सामान्य माणसासाठी खूप जास्त असू शकतो.
डॉ. गोयल म्हणाले, सर्वसाधारण नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने तेवढाच व्यायाम करावा, ज्यामुळे त्यांना फारसा थकवा जाणवणार नाही. व्यायामानंतर त्या व्यक्तीला रोजची कामं करता आली पाहिजेत व रात्री शांत झोप लागली पाहिजे.
SRL च्या तांत्रिक संचालक, डॉ. आभा सबखी यांच्या सांगण्यानुसार, लोकांचा जास्त व्यायाम करण्याकडे कल असतो मात्र तो त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. शारीरिक व्यायाम महत्त्वाचा आहे, पण तो व्यक्तीच्या शारीरिक मर्यादेनुसार असायला हवा.
अत्यधिक व्यायामामुळे हृदयाच्या टिश्यूजमध्ये ऑक्सिजनची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे कार्डिॲक ॲरिथमिआ (cardiac arrhythmia) अथवा मृत्यू होऊ शकतो.
याव्यतिरिक्त, अत्यधिक व्यायामामुळे हृदयाची गती आणि बीपी वाढल्यामुळे आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मायक्रोस्कोपिक टिअर येऊ शकतात, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
संशोधनातील निष्कर्षांनुसार, निरोगी व्यक्तींमध्ये अत्यधिक व्यायाम आणि ओव्हर-ट्रेनिंगमुळे काही प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामध्ये मस्कुलोस्केलेटल इजा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रतिकूल परिणाम, व्यायामामुळे स्नायूंचे होणारे नुकसान, व्यायामाशी संबंधित प्रतिकारशक्तीमध्ये बदल, व्यायामाशी संबंधित पुनरुत्पादन बिघाड, ऑस्टिओपोरोसिस आणि झोपेच्या विकार, या विकारांचा समावेश आहे. स्पोर्ट फिजिशिअन, ट्रेनर आणि हेल्थ एज्युकेटर यांनी या धोक्यांची जाणीव ठेवावी आणि त्यानुसार लोकांना व्यायामाचा सल्ला द्यावा.