नवी दिल्ली – भारतात कोट्यावधी लोक हे उच्च रक्तदाब (high blood pressure) म्हणजेच हायपरटेन्शन या आजाराशी लढा देत आहेत. आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजच्या काळात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला हा आजार झाल्याचे दिसून येत आहे. खराब जीवनशैली (bad lifestyle), पोषक आहाराचा अभाव आणि ताण हे हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोकाही वाढतो. मीठाचे अतिसेवन (salt) करणे हेही हाय ब्लड प्रेशरचा त्रास होण्यामागचे प्रमुख कारण आहे. मीठाचा रक्तदाबावर वाईट परिणाम होतो.
जागतिक आरोग्य संघटने (World health organization) नुसार, एका दिवसात 5 ग्रॅम पेक्षा अधिक मीठाचे सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे भविष्यात हृदयरोगाचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, सामान्यत: प्रत्येक प्रकारच्या अन्नात 3.8 ग्राम मीठ असते, जे खाल्यानंतर रक्तवाहिन्या उघडण्याच्या क्षमतेवर परिणाम करते.
जेवणात मीठाचा अती वापर केल्यास धमन्या आकुंचन पावतात व रक्तप्रवाहात प्रभावित होऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही स्थिती जेवणानंतर केवळ अर्ध्या तासातच होते.
जास्त मीठामुळे शरीराचे होते नुकसान
आहारात मीठाच्या अती सेवनामुळे ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि हृदयरोगाची जोखीम वाढते. कोणत्याही व्यक्तीने दिवसभरात 5 ग्रामपेक्षा अधिक मीठाचे सेवन करू नये. तसेच दिवसभरात शरीरात केवळ 2 ग्रॅम मीठ जाईल, असा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने करावा. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सांगण्यानुसार, ज्या लोकांना हायपरटेन्शनचा त्रास आहे त्यांनी दिवसभरात 1.5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ सेवन केल्यास ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तर जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार 5 ग्रॅम मीठामध्ये 2 ग्रॅम सोडिअम असते. कोणत्याही वयस्कर व्यक्तीने दररोज 2 ग्रॅमपेक्षा अधिक सोडिअमचे सेवन करू नये. म्हणजेच दररोज 5 ग्रॅमेपेक्षा अधिक मीठाचे सेवन करणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
मीठाशिवाय असलेल्या जेवणाची चव अळणी असते. मीठ हे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर त्याचे शरीराला अनेक फायदेही असतात. मीठामधून आपल्याला आयोडिन मिळते. ते थायरॉइट ग्लँड नियंत्रित करणे व शरीरात द्रवाचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे कार्य करते. त्याचे अनेक फायदे असतात, मात्र मीठाचा जास्त वापर हा आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. ठराविक प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता व निरोगी जीवन जगू शकता.