बद्धकोष्ठतेमुळे हल्ली प्रत्येकजण त्रस्त असतो. त्यामुळे पोट साफ होत नाही. परिणामी काहीच खाण्याचं मन होत नाही. पण या समस्येकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. नॉर्मल समस्येसारखंच या समस्येकडे पाहतो. पण तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तीन दिवस शौचाला गेला नाही तर हा धोक्याचा संकेत असू शकतो. त्याशिवाय शौचावेळी अधिक जोर लावावा लागत असेल तर ही सुद्धा एक गंभीर समस्या असू शकते. वेळीच उपचार केला नाही तर या समस्येतून मुक्तता मिळणं कठिण होतं.
बद्धकोष्ठतेवर उपचार होऊच शकणार नाही, अशी काही ही गोष्ट नाही. तुम्हाला फक्त तुमच्या डाएटमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं पोट सहज साफ होईल. तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास तुमचं पोट चांगलं राहील. कोणताही त्रास उद्भवणार नाही. शिवाय वारंवार शौचालाही जावं लागणार नाही. फक्त डाएटमध्ये नियमितता असली पाहिजे.
सकाळी दिवसाची सुरुवात ओटने करा. ओट्समध्ये सहज विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही फायबर असतात. पाण्यात घुसळून जाणारा फायबर जेल सारखा होतो. हे फायबर आपण खालेल्या अन्नपदार्थांना नरम बनवतात. त्यामुळे आपण जे काही खातो ते आपले आतडे आणि पोटातून सहज पास होतात. त्यामुळे तुम्हाला शौचावेळी अधिक जोर देण्याची गरज पडत नाही. बद्धकोष्ठतेतून मुक्तता मिळते.
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं अत्यंत महत्त्ववाचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी बद्धकोष्ठता दूर होणंही अत्यंत महत्त्वाचं असतं. पालक, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये केवळ भरपूर पोषक तत्त्वे नसतात तर त्यात फायबरचं प्रमाण प्रचंड असतं. ते पोटासाठी अत्यंत चांगलं असतं. या भाज्यांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
पाचन आरोग्याची जेव्हाही चर्चा होते तेव्हा आलूबुखारा खाण्याचा सल्ला दिला जातो. आलूबुखारा खाणं पोटासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यात अविघटनशील फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्यात नैसर्गिक लॅक्सेटिव्ह सोर्बिटोल अधिक प्रमाणात असतं. बद्धकोष्ठतेवरी नैसर्गिक उपायासाठी हे महत्त्वाचं मानलं जातं.
किवी, संत्रे, नाशपाती आदी फळं पचण्यास चांगली असतात. त्यामुळे पचनशक्ती चांगली होते. तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर ही फळे खा. त्यात फायबर मोठ्या प्रमाणावर आहे. त्याशिवाय या फळांमध्ये पाणी, सोर्बिटोल आणि फ्रुक्टोजचं प्रमाणही सर्वाधिक असतं.
अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. त्यामुळे पोटाला चांगला आराम मिळतो. आतड्यांसाठीही त्या खूप चांगल्या असतात. या बिया तुम्ही सहजपणे तुमच्या अन्नपदार्थात घेऊ शकता. त्या अख्ख्या खाऊ नका. तसं केल्यास तुम्हाला कोणताच फायदा होणार नाही. तसेच पोटही साफ होणार नाही.