नवी दिल्ली: देशातील कोरोना (Corona) विषाणू संसर्गाची स्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. कोरोना संदर्भातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात भारतात कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट (Corona Fourth Wave) 22 जूनपासून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असेल. ही लाट जवळपास चार महिने राहू शकते, असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. आयआटी कानपूरमधील संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेलवर हा अंदाज जारी करण्यात आला आहे. आयआयटी कानापूरमधील गणित आणि सांख्यिकी विभागाचे साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्र शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाची चौथी लाट नव्या वेरिएंट आणि देशातील कोरोना लसीकरणाची स्थिती यावर अवलंबून असेल.
संशोधकांच्या अंदाजानुसार भारतात कोरोना संसर्गाची चौथी लाट प्राथमिक आकडेवारीनुसार 30 जानेवारी 2020 नंतर 936 दिवसानंतर म्हणजेच 22 जून 2022 रोजी कोरोनाची चौथी लाट सुरु होऊ शकते. आणि 23 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लाट वाढेल. त्यानंतर कोरोना संसर्गाची लाट ओसरण्यास सुरुवात होईल. 24 ऑक्टोबर 2022 पर्यंत कोरोना संसर्गाची लाट ओसरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि त्याची संक्रामकता यावर अवलंबून असेल.
संशोधकांच्या मते, कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट ही कोरोना लसीकरण, बुस्टर डोस यावर अवलंबून असेल. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील यापूर्वी ओमिक्रॉन व्हेरिएंट हा कोरोनाचा अखेरचा व्हेरिएंट नसेल असं म्हटलं होतं.
जागतिक आरोग्य संघटेनं मे- जून च्या दरम्यान कोरोना विषाणूच्या पॅटर्नचं निरीक्षण करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कोरोनाची लाट आली नाहीतर एंडेमिकची घोषणा करण्यात येईल. ओमिक्रॉन बी. 2 व्हेरिएंटमुळं नवीन लाट आली नाही. चौथ्या लाटेचं स्वरुप मलेरिया आणि चिकनगुनियासारखं असू शकतं. मात्र, स्थिती काही दिवसात पूर्ववत होई शकते. जागतिक आरोग्य संघटेननं गर्दीच्या ठिकाणी रेल्वे आणि बसेसमध्ये मास्क लावणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
इतर बातम्या:
प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !
नागपूर शहराच्या प्रवाशांसाठी 438 बस धावणार!, मनपा परिवहन समितीच्या अंदाजपत्रकात नेमकं काय?