अहमदाबाद: म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)च्या आजाराची लागण आता लहान मुलांपर्यंतही पोहोचली आहे. अहमदाबादमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. लहान मुलाला ब्लॅक फंगसची लागण होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे. (First case of Black Fungus in a child reported at Gujarat)
अहमदाबादमधील या मुलाचा ब्लॅक फंगस रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अहमदाबादच्या अॅपल चिल्ड्रन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. ब्लॅक फंगस वगळता या मुलाला कोणताही आजार नसल्याचं सांगण्यात आलं.
या मुलाच्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तर हा मुलगा कोरोनातून बरा झाला होता. मात्र दीड महिन्यानंतर त्याच्यात ब्लॅक फंगसचे लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी त्याची टेस्ट केली असता तो ब्लॅक फंगस पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याचं आज तातडीने ऑपरेशन करण्यात आलं. हा मुलगा सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
आतापर्यंत वयस्कांमध्येच ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. लहान मुलांना ब्लॅक फंगस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे लहान मुलांचीही काळजी घेण्याची गरज आहे, असं अहमदाबादमधील डॉक्टर चेतन त्रिवेदी यांनी ‘आजतक’शी बोलताना सांगितलं. डॉ. अभिषेक बंसल यांनी या मुलाच्या नाकाचं ऑपरेशन केलं आहे. एप्रिलमध्ये या मुलाला कोरोना झाला होता. त्यानंतर तो बराही झाला होता. मात्र अचानक त्याच्यात ही लक्षणे आढळून आली आहेत, असं बंसल म्हणाले.
दरम्यान, कोरोना पाठोपाठ आता ब्लॅक फंगसनेही देशात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात ब्लॅक फंगसचे 7251 रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 219 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. ब्लॅक फंगसच्या केसेस वाढल्याने राज्यांनी या आजाराला महामारी घोषित करावं, अशी सूचना केंद्राने केली होती. देशात महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 1500 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 90 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 1163 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. (First case of Black Fungus in a child reported at Gujarat)
सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 21 May 2021 https://t.co/xFaiKk2Fhg #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2021
संबंधित बातम्या:
Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?
अहमदनगरमध्ये कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचं थैमान, तब्बल 61 जणांना संसर्ग, औषधांसाठी नातेवाईकांची वणवण
या लोकांसाठी ब्लॅक फंगस अधिक घातक, डोळ्यांची दृष्टी जाते, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
(First case of Black Fungus in a child reported at Gujarat)