मुंबई: भारतात नद्या, तलाव आणि समुद्राची कमतरता नाही, म्हणूनच ताज्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे या देशात मुबलक प्रमाणात आढळतात. बऱ्याच लोकांना मासे खाणे आवडते, परंतु चरबीयुक्त मासे खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी किती फायदे होऊ शकतात हे आपल्याला माहित आहे. चला तर मग त्याच्यावर एक नजर टाकूया.
मासे खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे
- मासे खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. माश्यांमध्ये अमीनो ॲसिड असतं. हे ॲसिड शरीराच्या विकासासाठी आणि सामर्थ्यासाठी उपयुक्त आहेत.
- माशांमध्ये ओमेगा -2 फॅटी ॲसिड असतात जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
- चरबीयुक्त माशांमध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी ॲसिड आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्सचा विकास स्थिर ठेवण्यास मदत करते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि सामर्थ्य वाढू शकते.
- माशांमध्ये नैसर्गिकरित्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आतडे निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
- लहान वयातच जर तुमची हाडे कमकुवत होऊ लागली तर नियमित मासे खा कारण त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात.
- माशांमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवतात, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते.
- माशांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असते जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
- गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते.
- मधुमेहाच्या रुग्णांनी चरबीयुक्त मासे खावे कारण यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर टिकून राहण्यास मदत होते.
- माशांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई आणि सेलिन आपल्याला नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात, जे शरीराला नुकसानापासून वाचविण्यास मदत करतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)