मुंबई : सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतो आहे. बाहेरचे सतत खाणे आणि रात्री लेट नाईट जागणे यामुळे सर्वांचीच जीवनशैली खराब होते आहे. काही लोकांची खाण्याची पध्दत इतकी जास्त चुकीची आहे की, त्यांचे शरीर यामुळे रोगांचे माहेर घर होते. एक प्रकारे तुमच्या शरीरात (Body) विषारी पदार्थ जमा होतात. जर सतत हीच समस्या राहिली तर मग मधुमेह, डायबिटीज आणि वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होतात. बरेच लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीच्यानिमित्ताने घराबाहेर राहतात. म्हणजेच त्यांना इच्छा असूनही घरचे जेवण मिळत नाही. मजबुरीने त्यांना बाहेरचे अन्न खावे लागते. मग अशावेळी शरीर निरोगी (Body healthy) ठेवण्यासाठी बॉडी डिटॉक्ससाठी काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करायला हव्यात.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक पेय आहे. पाण्याचे सेवन करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. विशेष म्हणजे पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. जास्त पाणी पिऊन तुम्ही किडनी स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकता. दररोज किमान 3 लिटर पाणी प्या. पाण्याने शरीर डिटॉक्स होते.
दारूचे व्यसन शरीरासाठी घातक आहे. शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमचे शरीर डिटॉक्स करायचे असेल तर दारूचे अजिबात सेवन करू नका. दारूमुळे शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भिती देखील असते.
झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पूर्ण बॉडी डिटॉक्स करायची असेल तर झोप व्यवस्थित असणे आवश्यक आहे. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीर डिटॉक्स होते. झोपेमुळे शरीर डिटॉक्स होते आणि तुम्हाला मानसिक ताण येत नाही. यामुळे नेहमीच 7 ते 8 तासांची झोप आवश्यक घ्या.
आजकाल बहुतेक लोकांना वाढलेल्या वजनाचे टेन्शन आहे. व्यायामाचा अभाव आणि अस्वस्थ आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन काही कमी होत नाही. मात्र, वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स पेय फायदेशीर ठरतात. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस टाकून प्या. यामुळे आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.