पावसाळा सुरू झाला की, त्वचेतून अतिरिक्त तेल निघू लागते. त्वचेवर हे अतिरिक्त तेल (Excess oil) धूळ, घाण आणि बॅक्टेरियाही सोबत घेऊन येत असते. त्यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात. यामुळे पुरळ आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक स्किनकेअर (Ayurvedic skincare) टिप्स फॉलो करा. याच्या मदतीने तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांपासून स्वतःला वाचवू शकाल. या ऋतूत जास्त घाम आल्याने भरपूर पाणी वाया जाते. अशा स्थितीत डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. हे तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवेल. यासारखेच्या आणखी काही आयुर्वेदिक टीप्स जाणून घ्या, ज्यामुळे तुमची त्वचा पावसाळ्यातही अधिक चमकदार (More shiny) आणि सुंदर दिसू शकते.
पावसाळा सुरू झाल्यावर तुम्ही, त्वचेची खास काळजी घेण्यासाठी काही ज्यूसचे सेवन करणे गरजेचे असते. यात बीट, गाजर, काकडी, गहू आणि दूधीपासून बनवलेले ज्यूस आवश्यक प्या. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यात मदत करतात. हे केवळ तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल असे नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करेल.
पावसाळ्यात आम्लयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. दही, चिंच, लिंबूवर्गीय फळे आणि व्हिनेगरचे सेवन टाळा. आंबवलेले अन्न, खारट आणि मसालेदार अन्न शरीरात पित्त वाढवते. या गोष्टींचे सेवन केल्याने त्वचेवर मुरुम, खाज आणि एक्जिमा सारख्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळा म्हणजे तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होतात. यामुळे डाग, पुरळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेसाठी आयुर्वेदिक उटने वापरू शकता. यासाठी हळद, कोरफड, चंदन आणि कडुलिंबापासून बनवलेले हर्बल फेस पॅक वापरता येऊ शकतात. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात. ते तुमची त्वचा एक्सफोलिएट करतात.
पावसाळ्यात त्वचेवर ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही कडुलिंब आणि हळद यांसारख्या हर्बल तेलांनी त्वचेची मालिश करू शकता. यामुळे तुमची त्वचा संक्रमणापासून मुक्त होण्यास मदत होईल. अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही या तेलाने मालिश करू शकता.