त्वचेवर रॅशेस, पिंपल्स येणे हे सामान्यत: होत असतेच , पण जर त्यावर एखादे इन्फेक्शन झाल्यास तो चिंतेचा विषय ठरू शकतो. बऱ्याच वेळा लोकांच्या त्वचेवर लाल चट्टे दिसतात, ज्याकडे ते सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र तो सोरायसिस (Psoriasis treatment) असू शकतो. सोरायसिस ही त्वचेसंबंधी एक समस्या असून त्यामध्ये त्वचेच्या पेशींची जलद वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजलेले चट्टे येतात व त्याला भयानक खाज सुटून पापुद्रे निघतात. त्वचेशी संबंधित (Skin care) या आजाराकडे बिलकुल दुर्लक्ष (Do Not Neglect) करू नये. त्यावर तत्काळ इलाज करणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा हा आजार हळूहळू वाढून संपूर्ण शरीरभर पसरू शकतो आणि त्वचेला खाज सुटू लागते व जळजळ होऊ लागते. हा आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार सुरू करावेत. या आजारात कोपर, गुडघा तसेच पाठीच्या खालच्या भागात लालसर चट्ट दिसू लागतात व खाज सुटते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा एक ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणारा हा आजार , कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. या आजारातील त्रासापासून मुक्तता होण्यासाठी अनेक लोक बरीच विदेशी औषधे वापरतात. मात्र आयुर्वेदातही सोरायसिसवर अनेक उपचार सांगितले आहेत. जाणून घेऊया असे काही उपाय, ज्यामुळे सोरायसिसचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
दोडक्याची भाजी बऱ्याच जणांना आवडते, तर काहींना नाही. पण याच्या दोडक्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. दोडक्याच्या पानांतील रसामुळे सोरायसिसची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार, शरीरावर लाल चट्टे उमटले असल्यास दोडक्याच्या पानांचा रस त्यावर लावल्यास त्वरित आराम मिळतो. त्यासााठी नारळाच्या तेलात दोडक्याच्या पानांचा रस मिसळावा. शरीरावर ज्या जागेवर त्रास होत आहे, तिथे हे मिश्रण लावून ठेवावे. सलग 2-3 दिवस हा उपाय केल्यास अपेक्षित परिणाम दिसून येईल व त्वचेवर लाल चट्टे कमी होतील.
कडुलिंबाचेही अनेक औषधी गुणधर्म असतात. अनेक आजारांत त्याचा पाला औषधी म्हणून वापरला जातो. पण त्याचे सालही तेवढचे गुणकारी असते. त्यामधील ॲंटी – बॅक्टेरियल गुणधर्म आपले आरोग्य, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर असतात. कडुलिंबाची साल मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी . आणि ती पेस्ट सोरायसिसचा त्रास होत असलेल्या भागावर लावावी. सुमारे एक आठवडा नियमितपणे हा उपाय केल्यास सोरासयसिसमुळे होणारा त्रास कमी होतो.