पायाला सूज येणे (Swelling in feet) ही काही सामान्य गोष्ट नव्हे. पायांना जर सूज येत असेल तर आपल्याला शरीरात कोणत्या ना कोणत्या प्रकारची समस्या (body problem) आहे, हेच त्यातून दिसते. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ज्या व्यक्ती बराच काळ उभ्या राहतात किंवा बसलेल्या असतात, त्यांच्या पायाला सूज तर येतेच, पण त्याशिवाय त्यांच्या पायांमध्ये वेदनाही (pain in feet)होतात. पायांशी संबंधित ही समस्या एखाद्या आजारासाठी कारणीभूत ठरू शकते. पायाला सूज येण्यामागचे कारण काय व त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील हे जाणून घेऊया.
– आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांच्या शरीरात जास्त द्रव जमा होते, त्यांना बऱ्याच वेळा पायाला सूज येण्याचा त्रास होतो.
– आयुर्वेदातही पायाला सूज येण्याचे कारण सांगितले आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, जर कफ आणि वात दोष दूषित झाला, तर शरीरातील काही भागांवर वारंवार सूज येऊ शकते. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, हे यामागचे प्रमुख कारण मानले जाते.
– एखाद्या औषध सेवन केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून आले तर अशा परिस्थितीत शरीराच्या अवयवांना सूज येऊ लागते.
– ज्या लोकांना किडनीचा त्रास होतो त्यांना देखील बऱ्याचदा हात, पाय, किंवा तोंडाला सूज येण्याची समस्या वारंवार उद्भवते.
– खरंतर पायांना सूज येते तेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधणे अधिक चांगले असते, परंतु घरगुती उपचार केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो. पायाला सूज येत असेल तर लिंबाचे सेवन लाभदायक ठरू शकते.
एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. हवं तर त्यात मधही घालू शकता. त्याचे सेवन करावे.
– ऑलिव्ह ऑईलने मालिश करूनही सूज कमी केली जाऊ शकते. ऑलिव्ह ऑईल गरम करावे. नंतर त्यामध्ये लसणाच्या सोललेल्या व ठेचलेल्या पाकळ्या घालाव्या. हे तेल थोडे कोमट करावे आणि ज्या भागाला सूज आली असेल तिथे हे तेल लावून मालिश करावे. त्याने आराम मिळू शकतो.
– आहारात सूपरफूडचा समावेश करावा, जे पोषक तत्वांनी समृद्ध असते. तुम्ही चिय सीड्स, केळं, राजमा आणि मुगाच्या डाळीचे सेवन करू शकता.