मुंबई : काही राज्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात विविध सेमिस्टर आणि स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत, तसेच परीक्षांसाठी जोरदार तयारी करत आहेत. डिजिटल उपकरणं दीर्घ काळ वापरणं, पुस्तकं वाचणं, वाचन आणि परीक्षेचे दडपण यामुळे शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सहसा विचारात घेतल्या न जाणाऱ्या ‘डोळे’ या अवयवाला प्रचंड थकवा येतो.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय नेहमी करणे आवश्यक
हैदराबादमधील मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटलमधील फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. वामशीधर हे परीक्षेच्या आधीच्या दिवसांमध्ये डोळ्यावर ताण आल्याची तक्रार अनेकदा करणाऱ्या रुग्णांशी नियमितपणे संवाद साधतात. डोळे निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असलेले उपाय नेहमी करणे आवश्यक आहे.
फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. वामशीधर यांच्या मते, “डोळ्यांची योग्य निगा राखत असताना, तुम्हाला अनेक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. डोळ्यांचे कार्य सुरळीत राखण्याच्या दृष्टीनं करायचे व्यायाम आणि विविध टप्पे याचे गांभीर्य फार कमी जणांना असते.”
अनेकांना होणारे डोळ्यांचे त्रास बरे करण्यासाठी पुढे काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत
उपाय: वाचन करताना डोळ्यांपासून किमान 25 सेमीचे अंतर राखणं गरजेचं आहे. अनेक तास वाचन करत असताना मध्ये पुरेशी विश्रांती (5 ते 10 मिनिटं) घ्यावी. 5 मीटर अंतरावर असलेल्या लांबच्या वस्तूंवर नजर टाकल्यासही डोळ्यांना आराम मिळू शकतो.
2. पुरेशी झोप न झाल्यानं डोळे कोरडे होतात, यामुळेही डोळ्यांची जळजळ होते. संसर्ग होण्याचे व अस्वस्थपणा येण्याचे हे आढळणारे कारण आहे.
उपाय: डोळे ताजेतवाने ठेवण्यासाठी डोळे चोळणे टाळा. डोळ्यांवर गार पाणी मारल्यास डोळे ताजे राहतात व ओलावा टिकून राहतो. कृत्रिम अश्रू किंवा आयड्रॉप किंवा ल्युब्रिकेशन यासारखे पर्याय वापरल्यास डोळ्यांतला नैसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी मदत होते.
3. काँटॅक्ट लेन्स वापरल्याने झोप अपुरी होणे, हा सर्रास आढळणारा आणखी एक प्रश्न आहे. अनेक तास काँटॅक्स लेन्स घालून ठेवल्यास डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. यामुळेही डोळ्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
उपाय: अशा स्थितीमध्ये, चष्मा वापरावा आणि लेन्स आणि चष्मा असा दोन्हीचा आळीपाळीने वापर करावा. विद्यार्थ्यांनी सिलिकॉन हायड्रोजनपासून बनवलेल्या चांगल्या गुणवत्तेच्या काँटॅक्ट लेन्सचा वापर करावा. ऑक्सिजन खेळता राहण्याची प्रक्रिया सुधारित असणारे हे नवे साहित्य आहे. यामुळे अस्वस्थ वाटण्याचे प्रमाण बरेच कमी होते.
आकडेवारीनुसार, अपुरी झोप झाल्याने किंवा भरपूर अभ्यास केल्यानं परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 5-10% शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो किंवा डोळ्यांना थकवा जाणवतो.
काही खास टिप्स
1. तुम्हाला चष्मा असेल तर अभ्यास करत असताना नेहमी चष्मा वापरायला हवा.
2. तुम्ही काँटॅक्ट लेन्स वापरत असाल तर दररोज 10-12 तासांपेक्षा जास्त वेळ लेन्स घालू नका.
3. टीव्ही बघणे किंवा मोबाइल गेम खेळणे टाळा.
4. 20-20-20 या नियमाचा सराव करा. 20 मिनिटं वाचन केल्यानंतर डोळे 20 सेकंद बंद करा आणि त्यानंतर 20 फूट इतक्या अंतरावर पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण बराच कमी होईल.
5. ल्युब्रिकंट आयड्रॉप नेहमी किंवा गरजेनुसार वापरा.
साधारणपणे घ्यायची काळजी आणि बाळगायची सावधगिरी:
मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशल्टी ही नेत्र रुग्णालयांची साखळी परीक्षेच्या कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करते. सतत डोके दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे आणि डोळ्यांमध्ये सतत वेदना होणे, अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने त्यांच्या पाल्याला नेत्रतज्ज्ञांकडे न्यावे आणि संपूर्ण नेत्रतपासणी करून घ्यावी, असे मॅक्सिव्हिजनचे मत आहे.
डॉ. वामशीधर, फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल
संबंधित बातम्या
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, सक्रिय रुग्णसंख्या 4.1 लाखांवर
कोरोना काळात लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या औषधी वनस्पती आणि मसाले वापरा!
Health Care : चहाच्या ‘या’ फायद्यांविषयी तुम्हाला कदाचित माहिती नसेल, वाचा सविस्तर!