Health | हृदयाची काळजी घेण्यासाठी फक्त या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!

| Updated on: Apr 26, 2022 | 3:22 PM

धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. महिलांनी तर चांगल्या आरोग्यासाठी धूम्रपानापासून दूर राहावे. धूम्रपान केल्यास गर्भधारणेत समस्या उद्भवू शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ज्यामुळे महिलांनी धूम्रपानपासून चार हात लांब राहणे फायदेशीर आहे.

Health | हृदयाची काळजी घेण्यासाठी फक्त या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी जीवन जगा!
आरोग्याची काळजी घ्या
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : ह्रदयविकाराचे (Heart disease) रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महिलांना त्यांचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. महिलांमध्ये (Womens) हृदयविकार, लठ्ठपणा या समस्यांमध्ये सतत वाढ होताना दिसते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली हे आहे. निरोगी राहण्यासाठी व्यायाम (Exercise) हा खूप जास्त महत्वाचा आहे. तसेच काही गोष्टी फाॅलो करूनही आपण या समस्यांवर मात करू शकतो. या टिप्स नेमक्या कोणत्या याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

खालील टिप्स फाॅलो करत ह्रदय निरोगी ठेवा

  1. धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. महिलांनी तर चांगल्या आरोग्यासाठी धूम्रपानापासून दूर राहावे. धूम्रपान केल्यास गर्भधारणेत समस्या उद्भवू शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ज्यामुळे महिलांनी धूम्रपानपासून चार हात लांब राहणे फायदेशीर आहे.
  2. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. सध्याच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण रात्री उशीरापर्यंत जागतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले झोप मिळत नाही. यामुळे हार्मोन मेलाटोनिनचे प्रमाण कमी होऊन तणाव वाढतो. ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.
  3. जर तुम्हाला हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले पाहिजे. हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या हृदयाची देखील पूर्ण काळजी घेतली पाहिजे. जंक फूडपासून शक्यतो दूर राहा, फक्त हेल्दी आणि कमी तेलकट पदार्थ खा. जर तुम्ही सतत जंक फूड आहारामध्ये घेतले तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढेल.
  4. हृदय निरोगी ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे. वजन जास्त असेल तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी शक्यतो साखरेचे प्रमाण कमी करा तुम्ही अतिरिक्त साखरेचा वापर टाळावा. वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम आणि व्यवस्थित डाएट घेतला पाहिजे. तसेच रात्री 7 च्या अगोदर जेवल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.