मुंबई : पाणी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे (Important) आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळेच पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. एकवेळा माणूस अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकले, मात्र पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. आयुर्वेदानुसार पाणी (Water) पिण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही बसलेले असाल किंवा जेवत असाल किंवा पडून किंवा उभे असाल त्यावेळी योग्य पध्दतीने पाणी पिणे महत्वाचे आहे. प्रत्येकाला दररोज 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते. उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये तर जेवढे जास्त पाणी आपण पितो, तेवढे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळेच नेहमी आपण पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे.
नेहमी पाणी पिताना खाली बसले पाहिजे. उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शुद्ध न होता थेट पोटात मोठ्या ताकदीने जाते. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. याशिवाय तुम्ही उभे राहून पाणी प्यायल्यास, शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला जास्त गतीने पाणी पुरवठा होईल. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते. यामुळेच कधीही पाणी उभे राहून पिऊ नये.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही बसून हळूहळू पाणी प्यावे. कारण शरीराला पोषण मिळण्यासाठी ते गाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. हवेतील ऑक्सिजनची कमतरता आणि अन्न नलिका हे कारण असू शकते. हृदयाच्या समस्या आणि फुफ्फुसाच्या समस्या देखील होऊ शकतात.
जेवण करताना आणि नंतर लगेच पाणी पिणे टाळा. कारण पाणी शरीरातील नैसर्गिक रस पातळ करू शकते. यामुळे पचनाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. व्यायाम करताना जास्त पाणी पिऊ नका. कारण शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स हळूहळू कमी होऊ शकतात. यामुळे शरीरात थकवा येऊ शकतो.