थंडीच्या दिवसात वाढू शकतो हाडांचा त्रास, बचावासाठी करा हे उपाय

| Updated on: Dec 02, 2022 | 4:42 PM

हिवाळ्याच्या दिवसात ऊन कमी वेळासाठी असते, ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे हाडांचा त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

थंडीच्या दिवसात वाढू शकतो हाडांचा त्रास, बचावासाठी करा हे उपाय
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – थंडीचे दिवस (winter pain) सुरू झाले आहेत. या ऋतूमध्ये अनेक आजार होण्याचा धोका असतो. मात्र त्यापैकी सांधेदुखी (joint pain) ही गंभीर समस्या आहे, ज्याचा परिणाम कोणत्याही वयोगटातील व्यक्तीवर होऊ शकतो. थंडीमध्ये बरेच लोक सांधेदुखीची तक्रार करतात. तापमान कमी झाल्यामुळे नसा आकुंचन पावतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे (vitamin D) हाडांचा त्रास वाढतो. अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या हाडांची विशेष काळजी घेतली पाहिजे. हा त्रास 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त दिसून येतो. पण आता कमी वयातील लोकांनाही ही समस्या सतावते.

वैशाली मॅक्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंटचे असोसिएट डिरेक्टर डॉ. अखिलेश यादव सांगतात की हिवाळ्याच्या दिवसात ऊन कमी वेळासाठी असते, ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे हाडांचा त्रास होऊ शकतो. जे लोक दिवसभर बसून काम करतात त्याना हा त्रास जास्त जाणवतो. जे लोक बऱ्याच काळासाठी कॉम्प्युटरवर बसून काम करतात, त्यांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. सतत एकाच जागी बसून राहिल्याने हाडं आखडतात, ज्यामुळे सांधेदुखी सुरू होते. हा त्रास कमी करायचा असेल तर कामातून थोडा वेळ काढून मध्येमध्ये ब्रेक घेतला पाहिजे. तसेच बसताना आपले पोश्चर नीट ठेवले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

कसा करावा बचाव ?

मॉर्निंग वॉक ठरतो फायदेशीर

दररोज मॉर्निंग वॉक केल्यास शरीराला फायदा मिळतो. सर्व वयोगटातील व्यक्तींनी सकाळच्या वेळेस थोडा वेळ तरी चालले पाहिजे. दिवसभरात कमीत कमी 2 ते 3 किमोमीटर चालणे आवश्यक आहे.

कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी घ्यावे

थंडीच्या दिवसांत उन्हात अवश्य जावे. असे केल्याने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माम होणार नाही व हाडंही मजबूत राहतील.

खाण्या-पिण्याकडे द्या लक्ष

खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देणेही गरजेचे आहे. त्यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन यांचा समावेश करावा. तसेच दूध, दही यांचेही सेवन करावे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात
व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम आहे अशा पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा.

तेलाने मलिश करावे
गरम तेलाने मालिश केल्यास हाडांना खूप फायदा होतो. मालिश केल्यामुळे हाडांना गरमी मिळते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)