Health Care : प्रेग्नंसीचा प्लान करताय?; आजच ‘या’ सवयींना निरोप द्या!

| Updated on: Oct 02, 2021 | 3:31 PM

आजच्या काळात स्त्री गर्भधारणा करू शकेल की नाही याची शाश्वती नाही. वाढत्या वयापासून, सर्व चुकीच्या सवयींमुळे गरोदरपणात समस्या निर्माण होतात. म्हणूनच, जर तुम्ही कुटुंब नियोजन करत असाल, तर काही सवयींना कायमचा निरोप द्यावा.

Health Care : प्रेग्नंसीचा प्लान करताय?; आजच या सवयींना निरोप द्या!
गरोदरपणा
Follow us on

मुंबई : प्रेग्नंसी प्लान कधी करा आणि मुलाच्या भविष्याचे नियोजन कसे करावे. ही सर्व तयारी अगोदरच केली जाते. गर्भधारणा झाल्यानंतर स्त्री पहिल्या दिवसापासून तज्ञांच्या संपर्कात असते. जेणेकरून पुढे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून. (Follow these tips if you are planning a pregnancy)

पण आजच्या काळात स्त्री गर्भधारणा करू शकेल की नाही याची शाश्वती नाही. वाढत्या वयापासून, सर्व चुकीच्या सवयींमुळे गरोदरपणात समस्या निर्माण होतात. म्हणूनच, जर तुम्ही प्रेग्नंसीचा प्लान करत असाल, तर काही सवयींना कायमचा निरोप द्यावा.

धूम्रपान

धूम्रपान स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही योग्य नाही. धूम्रपान केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेत फरक पडतो. जरी गर्भधारणा झाली तरी, सिगारेटमध्ये उपस्थित निकोटिन, टार आणि कार्बन मोनोऑक्साइड न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम करतात. यामुळे बाळाच्या वाढीवर वाईट परिणाम होतो, तसेच अकाली प्रसूतीचा धोका वाढतो.

दारू

एक काळ होता जेव्हा स्त्रिया दारूला स्पर्शही करत नसत. पण आजच्या काळात ती एक फॅशन बनली आहे. ज्या स्त्रिया वारंवार मद्यपान करतात. त्यांना गर्भधारणेचा इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त त्रास होतो. जर गर्भधारणेनंतर मद्यपान केले तर गर्भपात होण्याचा धोका वाढतो. तसेच, गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये हृदय आणि मेंदूशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

कॅफीन

जास्त कॅफीन घेणे देखील गर्भधारणेसाठी चांगले नाही. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की, कॅफीनचा प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो. त्याच वेळी, गरोदरपणातही मर्यादित प्रमाणात कॅफीन घेण्याचा सल्ला दिला जातो. दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिण्याच्या सवयीमुळे अकाली प्रसूती होऊ शकते.

झोप

आजच्या काळात स्त्रिया घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतात. अशा परिस्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सर्व कामे करण्यामध्ये महिलेला पुरेशी विश्रांती आणि झोप मिळत नाही. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर तसेच प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळेच आपल्या झोपेवर विशेष लक्ष द्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips if you are planning a pregnancy)