मुंबई : धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आहाराची (Diet) फारशी काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. अशा परिस्थितीत खराब कोलेस्ट्रॉलवर (Cholesterol) नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खराब कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करू शकता ते जाणून घेऊया. कारण सातत्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर आरोग्याच्या (Health) अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
निरोगी राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. आपण जे काही खातोय ते नीट पचणं खूप गरजेचं आहे. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. व्यायामामुळे तुम्हाला इतर अनेक आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळते. हे तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. यामुळे दिवसातून जेंव्हा वेळ मिळेल, त्यावेळी व्यायाम नक्कीच करा.
खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करत राहा. तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली, पालक आणि भेंडी यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता. ते केवळ खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करत नाहीत तर इतर अनेक आरोग्य फायदे देखील देतात.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हेल्दी कुकिंग ऑइल वापरा. असे स्वयंपाकाचे तेल वापरा जे एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. आपण सोयाबीन तेल, तीळ तेल, जवस तेल आणि ऑलिव्ह तेल सारखे स्वयंपाक तेल वापरू शकता. मात्र, तेलाचा अतिरेक नको, स्वयंपाक करताना कमीत कमी तेला वापर करा.
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करू शकता. सफरचंद, पपई, एवोकॅडो, मोसंबी, द्राक्षे आणि लिंबू यांसारख्या फळांचा आहारात समावेश करा. या फळांच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.