मुंबई : सध्या आपण पाहात असाल की, टाईप-2 मधुमेह (Type-2 diabetes) अनेकांची समस्या आहे. टाईप-2 मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाटताना दिसत आहे. टाईप-2 मधुमेह होण्याची अनेक कारणे देखील आहेत. टाईप-2 मधुमेह काही वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही होतो. एकदा मधुमेह (Diabetes) झाला की तो कधीच संपत नाही. तुम्ही फक्त त्यावर नियंत्रण ठेवू शकता. हा आजार टाळण्यासाठी चांगली जीवनशैली जगणे आवश्यक आहे. आहाराची काळजी घ्या, रोज किमान अर्धा तास व्यायाम (Exercise) करा. जीवनात अनावश्यक मानसिक ताण घेऊ नका. टाईप-2 मधुमेह कसा नियंत्रणात ठेवायचा आणि टाईप-2 मधुमेह होण्याची कारणे नेमकी कोणती यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत, डाॅक्टर प्रवीण घाडिगांवकर यांच्याकडून.
टाईप-2 मधुमेह 90 दिवसांमध्ये बरा का?
आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल की, योग्य उपचार आणि काही गोष्टींचे पालन करून आपण 90 दिवसांमध्ये टाईप-2 मधुमेह नियंत्रणात आणू शकतो ? यावर डाॅक्टर म्हणतात की, खरोखरच तुम्ही 90 दिवसांमध्ये टाईप-2 मधुमेह बरा करू शकतात. कारण टाईप-2 मधुमेहाची सुरूवात एका गोळीने होते आणि तरीही आपण आरोग्याकडे विशेष लक्ष दिले नाहीतर टाईप-2 मधुमेह गंभीर स्वरूप धारण करतो. एका गोळीने झालेली सुरूवात पुन्हा वाढते आणि टाईप-2 मधुमेहासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या गोळ्या ह्या घ्याव्या लागतात.
मधुमेहाचे योग्य निदान होणे गरजेचे
बऱ्याच वेळा लोकांना मधुमेह झाल्याचे समजण्यास उशीर होतो. यामुळे समस्या अधिक वाढण्यास सुरूवात होते. यामुळेच मधुमेहाचे निदान लवकर होणे खूप गरजेचे आहे. मधुमेहाचे निदान झाल्यावर आपण लगेचच डाॅक्टराचा संपर्क साधून योग्य उपचार घेणे देखील आवश्यक आहे. टाईप-2 मधुमेह झाल्यावर आपण आरोग्याची काळजी घेण्यासोबत नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्वाच आहे. डाॅक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या व्यवस्थित घेऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करा.
हा समज लोकांमध्ये पसरला आहे की मधुमेह असलेले लोक बरेचदा आजारी राहतात, परंतु असे अजिबात नाही. मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने आपल्या आहाराची आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेतल्यास तो सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगू शकतो. खरं तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिली तर आजारांपासून दूर राहू शकता.
संबंधित बातम्या :
Health care : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा, सर्व समस्या दूर राहतील!
Healthy Diet| निरोगी आरोग्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश अवश्य करा,आजारपण कायमचे पळून जाईल !