मुंबई: आजकाल हृदयाशी संबंधित आजारांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आपण हृदय कसे निरोगी ठेवू शकता?
हृदय निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. शरीराला हायड्रेट न करता व्यायाम केल्यास रक्त जाड होईल आणि रक्तात गुठळ्या होण्याच्या समस्या उद्भवू शकतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी 30 वर्षांनंतर वर्षातून दोनदा संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्या. असे केल्याने तुम्ही आजारांवर वेळेआधीच उपचार करू शकता. त्यामुळे वेळोवेळी आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्या. असे केल्याने तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडण्यापासून स्वत:ला वाचवू शकता.
दररोज 45 मिनिटे व्यायाम करा. हृदयरोगाबरोबरच उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा व्यायामाद्वारे टाळता येतो. लक्षात ठेवा की जर तुम्ही आधीपासूनच हृदयाचे पेशंट असाल तर तुम्ही तीव्र वर्कआउट टाळावे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी चरबी टाळली पाहिजे. ट्रान्स फॅटचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. त्यामुळे हृदयविकार टाळायचे असतील तर सर्वप्रथम आपला लठ्ठपणा नियंत्रणात ठेवा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)