मुंबई : कोरोनाची धास्ती घेतलेल्या या जगासमोर मंकी पॉक्स (Monkey pox) हा नवा धोका समोर येत आहे. जागतिक आरोग्य नेटवर्कच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, आतापर्यंत जगभरातील 58 देशांमध्ये मंकी पॉक्सची 3417 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता यावर चिंता व्यक्त करत जागतिक आरोग्य नेटवर्कने मंकी पॉक्सला साथीचा रोग घोषित केला आहे. यासोबतच WHO ला यावर जागतिक कारवाई (Global action) करण्यास सांगितले आहे. एम्सचे सहायक प्राध्यापक डॉ. युद्धवीर सिंग म्हणतात की, मंकीपॉक्सचा धोका खूप वेगाने वाढत आहे. हा विषाणू प्राण्यांपासून माणसात ज्या वेगाने पसरत आहे. ते, अतिशय चिंताजनक आहे. पुढे ते म्हणाले की वर्ल्ड हेल्थ नेटवर्क ही एक जागतिक आरोग्य निरीक्षणे नोंदविणारी संस्था आहे, त्यांनी WHO ला शिफारस केली आहे की, मंकी पॉक्स वर जागतिक पातळीवर विचार करावा. तसेच, WHN ने याला महामारी (Epidemic) म्हणून घोषित केले आहे. डॉ. युधवीर म्हणाले की, भारतात सध्या त्याची प्रकरणे खूपच कमी आहेत, परंतू आपणही सतर्क राहण्याची गरज आहे.
वर्ल्ड हेल्थ नेटकवर्कच्या म्हणण्या नुसार, मंकीपॉक्स विषाणू हळूहळू अनेक खंडांमध्ये वेगाने पसरत आहे. वर्ल्ड हेल्थ नेटवर्कच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, ज्या वेगाने तो पसरत आहे, जर आपण वेळीच सावध झालो नाही तर ते, संपूर्ण जगात या रोगाचा फैलाव होईल. ही चिंता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य नेटवर्कने याला महामारी घोषित केले आहे. जागतिक आरोग्य नेटवर्कने त्यास प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जागतिक कृतीची मागणी केली आहे. WHO च्या बैठकीपूर्वी ही घोषणा करून WHN ने हे एक गंभीर संकट म्हणून समोर ठेवले आहे. डब्ल्यूएचएनच्या सह-संस्थापकाने एका प्रसिद्धिपत्रकारद्वारे म्हटले आहे की, आम्ही सुरवातीच्या टप्प्यात कोरोना विषाणूला महामारी म्हणून घोषित न करण्याचा परिणाम पाहिला आहे, त्यामुळे आम्हाला कोणाचीही वाट न पाहता हे करावे लागले.
मंकीपॉक्स हे मानवांमध्ये कांचण्यां सारखेच आहे. पहिल्या टप्प्यात, संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणे दिसू लागतात. यामध्ये, श्वसन प्रणालींशी संबंधित लक्षणे दिसून येतात, रुग्णास ताप आल्यासारखे वाटते. यामुळे शरीरात वेदना आणि थकवा जाणवतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्वचेवर कुठेतरी गुठळ्या दिसतात. यानंतर शरीराच्या काही भागात पुरळ उठतात आणि नंतर हे पुरळ मोठ्या प्रमाणात वाढत जातात.