मुंबई : गर्भधारणेनंतर (pregnancy) महिलांना अनेक मानसिक व शारीरिक समस्यांचा (Physical problems) सामना करावा लागत असतो. यात ‘हार्मोनल’ बदलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होत असतो. जसे जसे गर्भधारणेचे दिवस वाढताच तसे तसे महिलांचे वजन वाढत जाते व त्यामुळे पायांवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होत असतो. यामुळे अनेक महिलांच्या पायांवर सूजदेखील येत असते. यातून पाय, कंबर, पाठ दुखणे, झोप न येणे आदी विविध समस्यांची निर्मिती होत असते. या सर्व समस्यांमध्ये प्रेग्नंसी पिलो (pregnancy pillow) फायदेशीर ठरत असतो. गर्भवतींना याची फार मदत होत असते. 2010 मध्ये पहिल्यांदा प्रेग्नंसी पिलोचे नाव चर्चेत आले होते. त्या वेळी विदेशी गायिका जेनिपर लोपेज यांनी पाठीमागील ‘सर्पोट’साठी याचा वापर करणे सुरु केले होते. त्यानंतर हळूहळू लोकांना समजले, की हा पिलो केवळ पाठीमागील सर्पोटसाठीच नव्हे तर गर्भवतींसाठीही फायद्याचा आहे.
गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेला पिलो अगदी वेगळा असतो. पुरेशी व शांत झोप येण्याच्या दृष्टीने याची बनावट करण्यात येत असते. आकाराचा विचार केल्यास सामान्य उशीपेक्षा खूप मोठा आकार असतो. ‘सी’ व ‘यु’ आकाराच्या प्रेग्नंसी पिलोला अधिक मागणी आहे. गर्भवती महिलांसाठी हा पिलो अतिशय फायदेशिर ठरत असतो. झोपेसह अनेक समस्यांपासून यातून सुटका होत असते.
1) गर्भधारणेनंतर महिलांना मोठ्या प्रमाणात पाठीचे दुखणे जडत असते. याशिवाय शांत झोप न लागणे, पायात तणाव निर्माण होणे मांसपेशींमध्ये आकुंचन होणे आदी विविध समस्यांचा सामना करावा लागत असतो. या सर्वांमुळे गर्भवतींना शांत झोप लागत नाही. त्यामुळे, डोकेदुखी, चिडचिडा स्वभाव, आळस आदी समस्या निर्माण होतात. परंतु या पिलोचा वापर केल्याने शांत झोप लागण्यास मदत होत असते. शिवाय हा पिलो पाठीला सपोर्ट करीत असल्याने पाठीचे दुखणेही कमी होते.
2) प्रेग्नंसी पिलो हा आकारानुसार लवचिक असतो. गर्भधारणेमध्ये महिलांच्या शरीर रचनेत अनेक बदल होत असतात. त्यानुसार हा पिलो आकार धारण करीत असतो. त्यामुळे यासोबत झोपताना महिलांना अतिशय आरामदाय वाटत असते.
3) पिलोचा वापर केल्याने महिलांचा कणा, मान, पाठ व नितंब सरळ राहतात. त्यामुळे महिलांना झोपताना अतिशय आरामदायक वाटत असते व शांत झोप लागते.
तस पाहिल्यास पिलोचा वापर कधीही केला जाउ शकतो, परंतु गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतर याचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. या कालखंडात वजन वाढल्याने महिलांच्या लिगामेंट्समध्ये अतिरिक्त दबाव निर्माण होत असतो. त्यामुळे अशा वेळी पिलोचा वापर करणे योग्य ठरत असते.
जपानमधील मुलं सर्वाधिक निरोगी का असतात? समोर आले अचंबित करणारे कारण…