मुंबईः आरोग्य तज्ज्ञ आणि कॅन्सर सर्जन (cancer surgeon) डॉ. अंशुमान कुमार म्हणतात की, आता देशाला मास्क फ्री (Mask free) करायची वेळ आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटनंतर (Omicron variant) कोरोना म्हणावा तसा घातक राहिला नाही. जर जनतेला मास्क मुक्त केले तरच त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी इम्युनिटी तयार होणार आहे. ज्यादिवसापासून भारतात कोरोना आला त्यादिवसांपासून कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्कचा वापर करा असं सांगण्यात आले आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव झाल्यानंतर या महामारीची तीव्रता थोडी कमी झाली. काही तज्ज्ञांच्या मते असंही व्यक्त करण्यात येत आहे की, कोरोना आता स्थानिक लेव्हलवरच राहणार आहे. तर ब्रिटनमध्ये तर खूप दिवसापूर्वी मास्कची सक्ती कमी करण्यात आली आहे.
कॅन्सर सर्जन डॉ. अंशुमान कुमार सांगतात की, आता देशाला मास्क मुक्त करा, याचा ते फायदा सांगतात की,ज्यांना कोरोना झालाच नाही त्यांची त्यांनी आता लागण होईल आणि त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल. नागरिकांना जरी ओमिक्रॉन व्हेरियंटची लागन झाली तरी कोरोनाचीच थोडी फार लक्षणं दिसतील. त्यामुळे जरी कोरोना झाला तरी त्यांच्या मध्ये अँटीबॉडी तयार होतील, आणि त्यांना कोरोनाचा धोकाही नसेल. ज्यावेळी कोरोनाची लागन मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा ज्यांना ज्यांना कोरोना झाला असेल त्यांच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण होतील. आणि ते नैसर्गिक पद्धतीनेच प्रतिकारशक्तीचं काम करतील. आणि त्याचा परिणाम असा होईल की, भविष्यात कधी तरी यापेक्षा भयानक जरी रोग आला तरी त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा धोका नसेल. त्यामुळे या महामारीचे चित्र बदलेल आणि ते स्थानीक पातळीवरच सीमित राहिल.
तज्ज्ञांच्या मते आता कोरोना देशात येऊन दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. आणि काळाच्या ओघात या रोगाची व्याप्तीही कमी झाली आहे. डेल्टा व्हेरियंटच्या वेळी कोरोनाचे प्रमाण प्रचंड वाढले होते, त्यावेळी मास्क वापरण अनिर्वायच होते. डेल्टा व्हेरियंटनंतर आता आणखी कोणता रोग आला असता तरी मास्क हे वापरावेच लागले असते असे अंशुमान कुमार सांगतात.
देशात डेल्टा रोगाचा प्रार्दूभाव झाल्यानंतर ओमिक्रॉन व्हेरियंट आला पण त्याची तीव्रता कमी होती. त्याची फक्त खोकला आणि सर्दी एवढीच दिसून आली. आणि ज्यांना त्याची लागण झाली आहे त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. या रोगानंतर जे रुग्ण सापडले त्या सगळ्यानाच रुग्णलयात दाखल करण्यात आले नाही फक्त ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही त्यांनाच फक्त रुग्णालयात दाखल केले गेले. आणि जे वयोवृद्ध आणि गंभीर आजाराने ग्रस्त होते अशा नागरिकानाच फक्त हॉस्पिटलायझेशन करावे लागले. कोरोना काळात रुग्णलयात दाखल झालेल हे सगळेच कोरोनाग्रस्त नव्हते तर इतर आजारही त्यांना होते. त्यामुळे आता ओमिक्रॉननंतर कोरोना महामारी आता धोकादायक राहिली नाही. हे अगदी सामान्य फ्लूसारखे झाले आहे. आता कोरोनाबाबत अशी परिस्थिती झाली आहे की, कोरोना आता आपल्यातच राहिल पण तो धोकादायक असणार नाही. त्यामुळे आता मास्कची सक्ती करुन चालणार नाही.
अंशुमान कुमार सांगतात की, आता ज्येष्ठ नागरिकांना कोरोना झाला तरी त्याची लक्षणं ही गंभीर नसतील मात्र अशा लोकांनी गर्दीपासून लांब राहिले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी आता मास्क वापरला नाही तरी चालू शकेल फक्त त्यांनी गर्दीपासून लांब राहिलं पाहिजे.
मास्क मुक्त केले म्हणजे याचा अर्थ असा नाही की, कोरोनाच्या इतर नियमही पाळू नयेत. शारीरिक आंतर, स्वच्छता ही राखावीच लागेल. कोरोनाच्या या नियमांना घेऊनच इथून पुढचं आयुष्य जगावं लागणार आहे.
Omicron नंतर, आता कोरोनाची तीव्रता कमी असणार आहे, कोरोना दरवर्षी येईल, मात्र तो अगदी फ्लूसारखाच राहील. जोपर्यंत व्हायरसमध्ये त्याचे परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत या महामारीपासून कोणताही धोका नाही. आता कोणताही धोकादायक रोग येण्याची शक्यता नाही.
संबंधित बातम्या
हृदयविकारानं ग्रासलंय? चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची भीती? जाणून घ्या आधुनिक उपचार पद्धती!
हार्टअटॅक येऊ नये, असं वाटत असेल, तर मग ही माहिती जाणून घेणं फार फार महत्त्वाचंय!