कोरोनामुक्त झाल्यावरही दर सहा महिन्याला टेस्ट का करावी?; वाचा सविस्तर

| Updated on: Sep 25, 2021 | 7:56 AM

कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या तरी 75 ते 80 टक्के कोविड रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. (Get tested every six months after the recovery of Covid - Research)

कोरोनामुक्त झाल्यावरही दर सहा महिन्याला टेस्ट का करावी?; वाचा सविस्तर
Covid
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या तरी 75 ते 80 टक्के कोविड रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ते घरीच टेलिकन्स्ल्टेशनने बरे होत आहेत. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा रुग्णावर दीर्घकालीन परिणाम होतो. अनेक महिन्यांपासून रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यावरही दर सहा महिन्याला टेस्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Get tested every six months after the recovery of Covid – Research)

यूरोपियन हार्ट जर्नलमध्ये काही संशोधन प्रकाशित झालं आहे. त्यानुसार ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांना कार्डिअॅक अॅरेस्टचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही महिलांना मृत्यूचा धोका अधिक आहे. व्हायरस थेट मायोकार्डियमच्या आत एसीई2 रिसेप्टर कोशिका नष्ट करतात. कोविडमुळे हृदयांच्या मांसपेशींना सूज येऊ शकते. त्याला मायोकार्डिटिस म्हणतात. वेळेवर त्याकडे लक्ष दिलं नाही तर त्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.

पॉझिटिव्ह आल्यानंतर हृदयविकाराचा धोका

आधीपासूनच हृदयरोग पीडित लोकांना सावध राहणे आवश्यक आहे. बरे होत असताना रुग्णांना मोठ्या प्रमाणावर कार्डियक अॅरेस्ट आला. त्यामुळे अनेकांनाच अकाली मृत्यू झाला. त्यामुळे भलेही कोविड व्हायरस कमी झाला तरी प्रतिकारक शक्ती अति सक्रिय होत असते. त्याचा शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होतो. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची 80 टक्के प्रकरणे समोर आली आहेत.

तर डॉक्टरांशी तात्काळ संपर्क करा

कोरोना झाल्यानंतर शरीराकडून अनेक संकेत मिळत असतात. रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार रोखणं कठिण होऊन जातं. कोरोना झाल्यानंतर एखाद्याच्या हृदयाच्या ठोक्याची गती वाढली असेल तर त्याने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कारण हृदयाचे ठोके अचानक वाढल्याने त्यानुसार वेगवेगळे संकेत मिळतात. त्यावर वेळीच उपचार होणं आवश्यक आहे.

रुग्णावर लक्ष ठेवा

कोरोना रुग्णाला ताप आल्यानंतर तो पातळ पदार्थ घेतो की नाही, यावर लक्ष ठेवलं पाहिजे. कधी कधी जे लोक कोरोनातून मुक्त होतात त्यांच्यात पोट्स ( पोस्टुरल ऑर्थोस्टॅटिक टॅचीकार्डिया सिन्ड्रोम) नावाची लक्षणे दिसतात. तसं पाहिलं तर पोट्स ही एक तंत्रिका संबंधीत समस्या आहे. ही तंत्रिका तंत्राच्या एका भागाला प्रभावीत करते. हृदयाची गती आणि रक्तप्रवाहामध्ये ती बाधा आणू शकते. (Get tested every six months after the recovery of Covid – Research)

 

संबंधित बातम्या:

आता डेंग्यूचाही वेगळा व्हेरिएंट, औरंगबाादेत रुग्णसंख्येत अचानक वाढ, ताप अंगावर काढू नका

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या तीन लाखांवर

Yoga Poses : मानदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘ही’ 5 योगासन नियमित करा!

(Get tested every six months after the recovery of Covid – Research)