Marathi News Health Giloy falsely linked to liver damage it is safe in appropriate doses ayush
गिलोय किंवा गुळवेलीमुळे यकृत खराब होतं…काय म्हणतं आयुष मंत्रायल…
आयुर्वेदात (Ayurvedic ) गुळवेलीला विशेष महत्त्वं आहे. गिलोय, गुळवेल आणि गुडुची अशा नावांनी ओळखली जाते. कोरोना महामारीत गिलोय काढाला सर्वात अधिक महत्त्वं प्राप्त झालं. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी गिलोयचा फायदा होतो. तसंच अनेक रोगांसाठी या काढाचा उपयोग केला जातो.
1 / 5
आयुर्वेदात (Ayurvedic ) गुळवेलीला विशेष महत्त्वं आहे. गिलोय, गुळवेल आणि गुडुची अशा नावांनी ओळखली जाते. कोरोना महामारीत गिलोय काढाला सर्वात अधिक महत्त्वं प्राप्त झालं. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी गिलोयचा फायदा होतो. तसंच अनेक रोगांसाठी या काढाचा उपयोग केला जातो. डॉक्टरांनीही अनेक आजारांसाठी रुग्णांना गिलोय काढाच्या सेवनाचा सल्ला दिला आहे. तर आयुष मंत्रालयानेही (Ayush Ministry)कोरोनाशी लढण्यासाठी गिलोयला मान्यता दिली.
2 / 5
गिलोय या काढाचा सेवन केल्यामुळे यकृत निकामी होतं. असा वादा जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपरिमेंटल या नियतकालीकेने केला. गिलोयचं सेवन योग्य की अयोग्य असा प्रश्न निर्माण झाला. यांनी केलेल्या रिसर्चमध्ये मुंबईतील 6 जणांचे यकृत गिलोयचं सेवन केल्याने खराब झाले, असं म्हटले आहे. या रिपोर्टनंतर लोकांच्या मनात गिलोयबद्दल संभ्रम निर्माण झाला.
3 / 5
या रिपोर्टची आयुष मंत्रालयाने दखल घेतली. गिलोयचं सेवन केल्यामुळे यकृत निकामी होत नाही, ही निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. गिलोय काढा हा पूर्णपणे सुरक्षित असून या काढामुळे यकृताचं नुकसान होत नाही. हा रिसर्च योग्य पद्धतीने मांडण्यात आला नाही, असं स्पष्ट आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.
4 / 5
गिलोय या आयुर्वेदिक औषधांच्या गुणधर्माबद्दल योग्य पद्धतीने या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं नाहीय. तर मुंबईतील ज्या रुग्णांचा या उल्लेख करण्यात आला आहे, त्या रुग्णांना देण्यात आलेली जडीबुटी नेमकी कुठली होती ते स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही. रिसर्च करणाऱ्यांनी त्या जुडीबुटीबद्दल योग्य संशोधन करण्याचा सल्लाही आयुष मंत्रालयाने दिला आहे.
5 / 5
अशाप्रकारची अफवा पसरवणं म्हणजे हे प्राचीन औषधांविरोधात लोकांचा मनात संभ्रम निर्माण करणे आहे. भारतीय हे मुळीच सहन करणार नाही, असंही आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संशोधन करताना संशोधकांनी गिलोयसारखी दिसणारी वनस्पती वापरली असेल तर त्याचा दुष्परिणाम होणारच. संशोधन करताना वनस्पतीची योग्य ओळख पटून आणि निर्धारित मार्गदर्शक सूचनांचं पालन झाले पाहिजे असेही आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा. गिलोय या काढाचा सेवन केल्यामुळे यकृत निकामी होतं. असा वादा जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपरिमेंटल या नियतकालीकेने केला. गिलोयचं सेवन योग्य की अयोग्य असा प्रश्न निर्माण झाला.