Health Benefits of Friendship: ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असो किंवा ‘ यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी’ अथवा ‘यारों दोस्ती बडी ही हसीन है’ हे गाणं असो.. कानाला सुमधुर वाटणारी ही गाणी सर्वांना आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यातील मित्रांचा संदर्भ.. प्रत्येक गाण्यात मित्र आणि त्यांची मैत्री (Friends and Friendship) किती महत्वाची आहे, हेच अधोरेखित केले. खरंच, मित्रांशिवाय आपलं आयुष्य किती भकास वाटतं ना ! सुख असो वा दु;ख, कोणत्याही क्षणी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे मित्र म्हणजे आपले सर्वस्व असतात. कधीकधी आई-वडील, भाऊ-बहीण किंवा आपल्या जोडीदाराशी ज्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही, त्याबद्दल आपण सहजरित्या आपल्या मित्राकडे मन मोकळं करतो. हीच मैत्री आपल्या आपल्या निरोगी आयुष्यासाठीही (Friends are important for good health) महत्वपूर्ण ठरते. एका अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे, की शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी चांगले मित्र आयुष्यात असणं फायदेशीर (Benefits) ठरतं.
चांगले मित्र असणे हे शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. मैत्रीमुळे कॅन्सर आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण होते, असेही त्या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. हे वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण बऱ्याच अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, निरोगी आयुष्यासाठी चांगले सामाजिक संबंध असणे गरजेचं असतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी माणसाला मित्रांची गरज असते. लहानपणी आपण सहजरित्या मित्र बनवतो, पण मोठ्या माणसांना ते पटकन जमत नाही. लहानपणचे मित्र आपल्यासोबत बराच काळ राहतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, ज्यांना चांगले मित्र असतात, त्या व्यक्तींना कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, हाय ब्लड प्रेशर ( उच्च रक्तदाब), कर्करोग आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती, यांसारख्या आजारांचा धोका कमी असतो. जे लोक समाज आणि मित्रांपासून दूर राहतात, त्यांना हे आजार होण्याचा धोका अधिक असतो.
2014 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, मैत्रीमुळे, चांगल्या मित्रांमुळे मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे लोकांचा एकटेपणा दूर होतो. एकटेपणाच्या भावनेमुळे डिप्रेशन, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, मद्यपानाची सवय, झोप न लागणे यासारख्या अनेक मानसिक व शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापासून वाचायचे असेल तर सर्वांनीच मित्र-परिवार वाढवायला हवा. मैत्रीमुळे आपली एकटेपणाची भावना दूर होऊन, त्याच्या गंभीर परिणामांपासून बचाव होतो तसेच आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते
सोशलायझेनशनमुळे आपल्या मानसिक व शारिरीक आरोग्य, दोघांनाही लाभ होतो. त्याचे कारण आहे ऑक्सीटोसिन, नावाचे हार्मोन. हा हार्मोन एक न्यूरोट्रान्समीटर आहे, ज्याची हायपोथॅलेमसमध्ये निर्मिती होते. हे हार्मोन सहानुभूति, उदारपणा आणि विश्वासाशी जोडलेले असते. आणि हेच सर्व घटक मैत्रीतही तितकेच महत्वपूर्ण असतात. एका रिसर्चदरम्यान, संशोधकांनी नाकातील स्प्रे च्या माध्यमातून काही व्यक्तींना ऑक्सीटोसिन देऊन पाहिले. त्या लोकांमध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास वाढल्याचे आणि जोखीम पत्करायची तयारी दिसून आली.