Grapes and Raisins
Image Credit source: Social Media
फळे आणि सुक्या मेव्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आज आपण त्यापासून तयार होणारी द्राक्षे आणि मनुका बद्दल बोलत आहोत. द्राक्ष हे असे फळ आहे ज्याची आंबट-गोड चव अनेकांना आकर्षित करते. त्याचबरोबर द्राक्षे वाळवून मनुके तयार केले जातात, जे अनेकांना आवडतात. मिठाई आणि गोड पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. द्राक्षांमध्ये 80 टक्के पाणी असते, तर मनुक्यात केवळ 15 टक्के पाण्याचे प्रमाण असते.
द्राक्षे भारी की मनुके भारी?
- आता प्रश्न असा पडतो की द्राक्षे आणि मनुका दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असताना कोणती गोष्ट अधिक आरोग्यदायी मानली पाहिजे? ग्रेटर नोएडाच्या एका प्रसिद्ध आहारतज्ञाने या प्रश्नाचे उत्तर दिले.
- द्राक्षांपेक्षा मनुकामध्ये जास्त कॅलरीज असतात. खरे तर द्राक्षे वाळवल्यानंतर मनुके तयार केले जातात. या प्रक्रियेत साखर आणि अँटीऑक्सिडंट्सचा वापर केला जातो, जो कॅलरीच्या स्वरूपात बदलतो. अर्धा कप द्राक्षे खाल्ल्यास फक्त 30 कॅलरीज मिळतील, तेवढ्याच प्रमाणात मनुका खाल्ल्यास शरीराला 250 कॅलरीज मिळतील.
- मनुका फायबरचा स्त्रोत मानला जातो, याशिवाय या ड्रायफ्रूटमध्ये लोह आणि पोटॅशियम सारखी महत्त्वाची खनिजे आढळतात. मनुकामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, जे आतड्यांमधील बॅक्टेरिया संतुलित करण्यास मदत करतात.
- द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, हे दोन्ही पोषक आपल्या त्वचेच्या पेशी तरुण ठेवण्यास मदत करतात. ते कर्करोगास जन्म देणाऱ्या किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतात. द्राक्षांचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होऊ लागतील.
मनुका आणि द्राक्षांपेक्षा आरोग्यदायी कोणते?
या दोन्ही गोष्टी आपापल्या परीने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण कॅलरी कमी असणारी गोष्ट आरोग्यासाठी चांगली असल्याने द्राक्षे अधिक आरोग्यदायी मानली जातात. शेवटी फळ खाणे कधीही उत्तमच!
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)