नवी दिल्ली: जास्त केस गळणे ही एक समस्या असू शकते, जी बऱ्याचवेळा आपल्या चिंतेचे कारण ठरू शकते. मात्र योग्य निदान झाल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करून केस गळतीवर नियंत्रण ठेवू शकता. या काही नैसर्गिक उपायांनी (natural remedies) आपले केसही मजबूत होतात. पण कोणताही उपाय करण्यापूर्वी, त्या समस्येमागचे कारण (Cause) जाणून घेणे गरजेचे आहे. असे कोणते कारण आहे, ज्यामुळे केसगळती (Hair Fall) एकदा सुरू झाली की थांबतच नाही ? ते समजले तर योग्य उपाय करता येतात. केसगळती रोखण्याचे काही उपाय जाणून घ्या व त्यांचा अवलंब करा. तुम्हाला जर लांब, घनदाट आणि मजबूत केस हव असतील आणि केसगळती रोखायची असेल तर हे नैसर्गिक उपाय करून पहा.
केसगळतीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात लोह, तांबे, झिंक (जस्त) आणि प्रोटीन्स यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असण्याची शक्यता आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता हे केस गळण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे. हे टाळायचे असेल बाहेर जावे आणि थोडा वेळ उन्हात बसावे.
वयाच्या 30 व्या वर्षांनंतर महिलांना हार्मोनल असंतुलन जाणवू शकते ज्यामुळे केसगळती होते. एस्ट्रोजेन हे मुख्य हार्मोन आहे, ज्यांचे स्त्रियांच्या शरीरात उत्पादन होते. मात्र त्याचप्रमाणे टेस्टोस्टेरॉन आणि अँड्रोजन यांसारखे डीएचईए (DHEA) हेही महिलांच्या शरीरात तयार होते. जसजशा स्त्रिया एका विशिष्ट वयापर्यंत पोहोचतात, त्या या या अँड्रोजनचे DHT मध्ये रूपांतर करू शकतात.
थायरॉइड ग्रंथीमध्ये थायरॉईड हार्मोन्स (संप्रेरक) जास्त प्रमाणात किंवा कमी अथवा अपुऱ्या प्रमाणात निर्माण झाल्यास केसांच्या वाढीचे चक्र बदलू शकते. तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर केस गळणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, थंड किंवा उष्णतेसंदर्भातील संवेदनशीलता आणि हृदयाच्या गतीमध्ये बदल होणे यासारखी लक्षणे तुम्हाला दिसून येतील.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ग्रस्त महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते ज्यामुळे अँड्रोजनची पातळी सामान्य स्तरापेक्षा जास्त असते. यामुळे अनेकदा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केस वाढतात, तर डोक्यावरील केस मात्र पातळ होतात. PCOS मुळे ओव्ह्युलेशनची समस्या, तसेच पुरळ येणे आणि वजन वाढमे, असे त्रास होऊ शकतात.
अत्याधिक ताण-तणावामुळे अचानक केसगळती सुरू होऊ शकते, जी (स्थिती) अनेक महिन्यांपर्यंत राहू शकते. व्यायाम करणे, मेडिटेशन करणे, योगासने आणि मालिश यांच्या माध्यमातून ताण कमी करून तुम्ही केस गळतीचे प्रमाण कमी करू शकता.
दर 6 ते 8 आठवड्यांनी केस ट्रिम केल्यास (थोडेसे कापल्यास) केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. त्याने दुभंगलेले केसही कमी होतात.
केसगळतीसह आरोग्याच्या अनके समस्यांचे मूळ कारण ताण हे आहे. ताण हा केसांच्या वाढीच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतो, तसेच अति ताणामुळे केस अकाली पांढरेही होऊ शकतात. नियमितपणे मेडिटेशन करणे आणि योगासने करणे, हा ताण कमी करण्याचा चांगला उपाय ठरू शकतो.
गरम पाण्यामुळे स्काल्पवर असलेले नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे केस हे कोरडे आणि निर्जीव होतात, व ते तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा आणि केस धुताना गार पाणी वापरावे.
आपले केस फार नाजूक असतात आणि ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच केस ओले असताना विंचरू नयेत. ते नीट वाळवावेत आणि त्यानंतरच रुंद दात असलेल्या कंगव्याने नीट विंचरावेत.
आपले केस मुळांपासून खूप घट्ट ओढले, तर नुकसान होऊ शकते, त्यामुळे तसे करणे टाळले पाहिजे. केस घट्ट बांधणेही टाळावे.