नवी दिल्ली : अमेरिकेच्या सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स (CIA Director William Burns) या महिन्यात आपल्या अधिकाऱ्यांसह भारत दौऱ्यावर आले होते. विल्यम बर्न्स यांनी सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्ससमोर एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. आपल्या अहवालात त्यांनी हवाना सिंड्रोम या गूढ आजाराच्या लक्षणांविषयी माहिती दिली. त्यांच्या मते, सुमारे 200 अमेरिकन अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हवाना सिंड्रोमचे बळी ठरले आहेत. या गूढ रोगाच्या लक्षणांमध्ये मायग्रेन, उलट्या होणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि चक्कर येणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. 2016 मध्ये, क्यूबामधील अमेरिकन दूतावासात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रथम या आजाराची लक्षणे आढळली होती.
हवाना सिंड्रोममुळे जगभरातील अमेरिकन आणि कॅनेडियन मुत्सद्दी, हेर आणि दूतावास कर्मचारी त्रस्त आहेत. 200 हून अधिक लोकांनी त्याच्या लक्षणांविषयी माहिती दिली आहे. हा रोग प्रथम क्यूबामध्ये सापडला, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कोलंबिया, रशिया आणि उझबेकिस्तानमध्ये याची लक्षण आढळून आली. 24 ऑगस्ट रोजी अमेरिकेची उपराष्ट्रपती कमला हॅरिसची व्हिएतनामला जाणाऱ्या फ्लाइटलला उशीर झाला होता. कारणं हनोईमध्ये हवानाची संशयास्पद प्रकरण आढळली होती.
2016 मध्ये क्युबाची राजधानी हवाना येथील अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या अनेक सीआयए अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यात दबाव आणि मुंग्या आल्याची तक्रार केली. त्या सर्वांना उलटीचा त्रास होत होता आणि थकल्यासारखे वाटत होते यासह त्यांना काही गोष्टी लक्षात ठेवणं अवघड झालं होतं. कानात दुखणे आणि ऐकण्यात अडचण येत होती. ही प्रकरण समोर आल्यानंतर जेव्हा मेंदू स्कॅन केला गेला, तेव्हा असे आढळून आले बॉम्ब स्फोटाच्या वेळी जसे मेंदूच्या ऊतींचे नुकसान होते त्याच प्रकारे त्यांच्या मेंदूतील उतींचं नुकसान झालं होतं. त्यानंतर लगेचच, अमेरिकन सरकारने आपल्या दूतावासातील अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना शहरातून काढून घेतले होतं.
सुरुवातीला अमेरिकन अधिकाऱ्यांना ध्वनी शस्त्रे वापरली गेली असल्याचा संशय होता. जी त्रासदायक आणि विचलित करणारी असू शकतात. पण नंतर हा सिद्धांत खोटा ठरला, कारण मानवी श्रवणबाह्य क्षमतेच्या बाहेरील आवाजाच्या लाटामुळे धडधडण्यासारखी लक्षणे होऊ शकत नाहीत. नंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी मायक्रोवेव्हबद्दल विचार केला.
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, इंजिनीअरिंग अँड मेडिसिन (NASEM) ने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालात असे सुचवले आहे की मायक्रोवेव्ह बीम कोणत्याही संरचनात्मक नुकसान न करता मेंदूच्या कार्याला हानी पोहोचवू शकतात. 2019 मध्ये, जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन (जामा) ही याच निष्कर्षावर पोहोचले. NASEM च्या मते, रशिया 1950 पासून मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानावर काम करत आहे, सोव्हिएत युनियन त्यांना मॉस्को येथील अमेरिकन दूतावासात स्फोट करण्यासाठी वापरत असे.
काही लोकांचे याबाबत वेगळं मत आहे , त्यानुसार हा एक सामूहिक मानसिक रोग असू शकतो. जेव्हा गटातील लोकांना कोणत्याही बाह्य कारणाशिवाय समान लक्षणे जाणवू लागतात तेव्हा हे होऊ शकते. या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्रासदायक लक्षणे असली तरीही. प्रत्यक्षात कोणताही आजार नाही. क्यूबामध्ये सतत पाळत ठेवण्याच्या दबावामुळे राजनैतिक अधिकारी आणि गुप्तहेरांना हा आजार होऊ शकते.
अमेरिकन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या पॅनेलने यासंदर्भात सर्वात तर्कसंगत सिद्धांत मांडला आहे, त्यानुसार निर्देशित स्पंदित रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जा या सिंड्रोमचे कारण असू शकते. बर्न्सचे म्हणणे आहे की हा सिंड्रोम हेतूपुरस्सर निर्माण केला गेला आणि रशिया त्यात सामील होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे.
इतर बातम्या:
Health Tips : दुधासोबत ‘हे’ अन्न पदार्थ खाणं टाळा, अन्यथा आरोग्यवर परिणाम होण्याचा धोका
Havana Syndrome really reached india decoding the mystery illness spies baffling which suffer American Peoples