मुंबई : भारतामध्ये मूळव्याधाच्या (Hemorrhoids) रूग्णांची संख्या ही सातत्याने वाढताना दिसत आहे. साधारण 10 पैकी 3 लोकांना मूळव्याध होतो आहे. मूळव्याधाची समस्या (Problem) निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे खराब जीवनशैली आहे. मूळव्याध म्हणजे नेमके काय आणि मूळव्याधाची नेमकी कारणे (Reason) कोणते हे जाणून घेणार आहोत. आैरंगाबादचे प्रसिध्द मूळव्याध तज्ज्ञ डाॅक्टर डॉ. वीरेंद्र जैस्वाल यांनी याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊयात.
मूळव्याधाचे प्रकार-
अंतर्गत मूळव्याध- अंतर्गत मूळव्याधामध्ये रूग्ण जेंव्हा शौच्यास जातो. तेंव्हा त्याला त्रास होते. शिवाय जास्त रक्त येते. यामुळे जखमा होण्याची देखील शक्यता जास्त आहे. या सर्व समस्यांमुळे रूग्णाला अत्यंत जास्त त्रास होतो. विशेष म्हणजे यादरम्यान आपण लाल तिखट किंवा हिरवी मिरची अधिक प्रमाणात आहारामध्ये घेतली तर समस्या अधिक होण्याची देखील शक्यता असते.
बाह्य मूळव्याध- या मूळव्याधाच्या प्रकारामध्ये रक्त पडण्याचे प्रमाण खूप कमी असते. मात्र, या मूळव्याध्यामध्ये कोंब बाहरे पडतात. यामुळे रूग्णाला शौच्यास त्रास होतो. विशेष म्हणजे यामध्ये कधी कधी कोंब अचानकपणे आता जातो आणि काही दिवसांनी परत बाहेर येतो. मात्र, जेंव्हा रूग्ण चाैथ्या टप्पामध्ये असतो, तेंव्हा कोंब बाहेरच राहतो. हे मूळव्याधाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत.
मूळव्याध होण्याची कारणे!
मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे आपली बदललेली आणि खराब जीवनशैली हेच आहे. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये बाहेरील खाद्यपदार्थ चायनीज वगैरे खाण्यावर विशेष भर देतो. यामुळे आपल्या आहारामधून आपल्या शरीराला हवे असलेले फायबर आणि विविध जीवनसत्वे अजिबात मिळत नाहीत. यामुळेच भारतामध्ये आताच्या घडीला जवळपास 4 लाख 40 हजार रूग्ण हे मूळव्याधाचे आहेत. विशेष म्हणजे सातत्याने मूळव्याधाच्या रूग्णांची वाढ ही भारतामध्ये होताना दिसते आहे. मूळव्याधाची समस्या कमी पाैष्टीक पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. शिवाय पाणी जास्त पिले पाहिजे.
संबंधित बातम्या :
Weight Loss Tips : फटाफट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खास 4 पेय प्या!
Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहिती!