Salt intake tips : जेवणात मीठ कमी केल्याने आरोग्याला हे फायदे होतात, वाचा सविस्तरपणे! 

| Updated on: Apr 17, 2022 | 9:56 AM

आपल्या सर्वांनाच चमकदार, चवदार आणि चकमकीत पदार्थ (Food) खायला आवडतात. त्यामध्येही भाजी, भात, पोळी, पराठे काहीही असो मीठ हे व्यवस्थित लागते. आपल्यापैकी बरेच लोक असतील त्यांना पदार्थांमध्ये मीठ (Salt) कमी झालेले अजिबात आवडत नसेल.

Salt intake tips : जेवणात मीठ कमी केल्याने आरोग्याला हे फायदे होतात, वाचा सविस्तरपणे! 
मिठाबाबत मोठी बातमी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांनाच चमकदार, चवदार आणि चकमकीत पदार्थ (Food) खायला आवडतात. त्यामध्येही भाजी, भात, पोळी, पराठे काहीही असो मीठ हे व्यवस्थित लागते. आपल्यापैकी बरेच लोक असतील त्यांना पदार्थांमध्ये मीठ (Salt) कमी झालेले अजिबात आवडत नसेल. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मिठामुळे जेवण चवदार बनत असले तरी त्याचे अतिसेवन शरीरासाठी अत्यंत धोकादायक (Dangerous) आहे. असे म्हटले जाते की मिठाच्या अतिसेवनाने हृदयविकार होऊ शकतो. त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे हृदयविकाराचा झटका. एवढेच नाही तर भाज्या किंवा इतर पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने हाडे दुखू शकतात. मात्र, अतिप्रमाणात मीठ खाणे टाळाच.

बीपी नियंत्रणात राहते

आजच्या काळात बीबीची समस्या ही वाढतच जाताना दिसते आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे आपला चुकीचा आहार हा आहे. जे लोक जेवणामध्ये अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करतात, त्यांनी हाय बीबीचा त्रास नेहमीच होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मीठाचे सेवन कमी प्रमाणात केल्यास बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे बीपीची समस्या होण्याच्या अगोदरच आहारामध्ये कमी प्रमाणात मिठाचे सेवन करा.

निर्जलीकरण

जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. यासाठी तुम्ही संतुलित प्रमाणात मीठाचे सेवन करावे. तज्ज्ञांच्या मते मीठ कमी प्रमाणात खाल्ल्याने डिहायड्रेशन होणार नाही. तसेच या आजारापासून दूर राहण्यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्या. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

हृदयरोग

हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रिपोर्ट्सनुसार जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही मीठ खाणे कमी केले तर आपले हृदय चांगले राहण्यास मदत होते. शिवाय बऱ्याच लोकांना जेवणामध्ये वरून मीठ टाकून खाण्याची सवय देखील असते. ही सवय तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कधीही पदार्थांमध्ये वरून मीठ टाकून खाऊ नका.

संबंधित बातम्या :

Weight Loss : जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी ओट्सची खास रेसिपी, वाचा!

Skin Care : ग्लोइंग स्किनसाठी कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!