मुंबई : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आजकाल अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात. काही लोक यासाठी वर्कआउट करतात, तर काही महागडे डाएट प्लॅन फॉलो करतात. लोक तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु काहीजण असे आहेत जे कामामुळे जिममध्ये (Gym) जाऊ शकत नाहीत. खरं पाहिले तर वजन घरी राहूनही कमी करता येते. वजन कमी करण्याच्या दोरीवरच्या उड्या देखील अत्यंत फायदेशीर ठरतात. दोरीवरच्या उड्यांमुळे आपण जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न (Calories burn) करू शकतो. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, अशांनी दररोज दोरीवरच्या उड्या नक्कीच मारायला हव्यात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल आणि निरोगी देखील राहू शकतो. मात्र, काही लोकांनी दोरीवरच्या उड्या मारणे टाळायला हवे. दोरीवरच्या उड्या नेमक्या कोणी टाळाव्यात हे आपण जाणून घेणार आहोत.
हृदयविकार असलेल्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यांची एक चूक घातकही ठरू शकते. काही लोक हार्ट पेशंट असूनही विचार न करता दोरी सोडण्यासारखे अनेक व्यायाम करण्याची चूक करतात. हृदयरोगींनी कोणत्याही प्रकारची शारीरिक दिनचर्या पाळण्यापूर्वी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे लोक व्यायामाची दिनचर्या पाळू शकतात.
ज्या लोकांना हाडांशी संबंधित समस्या येत आहेत, त्यांनी दोरीवरच्या उड्या अजिबात मारू नयेत. तुमच्या या चुकीमुळे हाडांचा त्रास आणखी वाढू शकतो. जर वजन वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखत असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल दुसरे व्यायाम नक्कीच करा.
ज्या लोकांनी काही काळापूर्वी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांनीही दोरीवरचा व्यायाम करणे टाळावे. शस्त्रक्रियेनंतर शरीर पूर्णपणे बरे झाले नसेल, तर अशा स्थितीत चुकूनही दोरीने उडी मारू नये. असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलक्या व्यायाम करू शकता. मात्र, दोरीवरच्या उड्या टाळाच.