‘डाराडूर’ झोप घ्या, लठ्ठपणा, तणावापासून मुक्त व्हा; पुरेशा झोपेसाठी ‘हे’ करा!

| Updated on: Aug 31, 2021 | 7:22 AM

पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 'डाराडूर' झोप घेतल्याने व्यक्ती केवळ प्रसन्नच राहत नाही तर अनेक प्रकारच्या आजारांपासूनही दूर राहतो. (Health: Deep Sleep Reduce Obesity By 50% And Depression By 90%)

डाराडूर झोप घ्या, लठ्ठपणा, तणावापासून मुक्त व्हा; पुरेशा झोपेसाठी हे करा!
Deep Sleep
Follow us on

नवी दिल्ली: पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘डाराडूर’ झोप घेतल्याने व्यक्ती केवळ प्रसन्नच राहत नाही तर अनेक प्रकारच्या आजारांपासूनही दूर राहतो. लठ्ठपणा, ताणतणाव आणि हृदयरोगासारख्या आजारांपासून दूर राहता येते. तसेच एखादा आजार झाल्यास पुरेसा आराम आणि झोप घेतल्यास त्या आजारातूनही लवकर बरे होता येते. (Health: Deep Sleep Reduce Obesity By 50% And Depression By 90%)

झोपेच्या एकूण चार स्टेज आहेत. सर्वात महत्त्वाची स्टेज म्हणजे स्टेज रॅपिड आय मुव्हमेंट म्हणजे REM आहे. तुम्ही स्वप्न पाहात असता ती ही स्टेज. या स्टेजमुळे शरीराला सर्वाधिक फायदा मिळतो. तुम्ही जर आठ तास झोपत असाल तर यात 20 टक्के म्हणजे 96 मिनिट पुरेशी झोप म्हणजेच REM आवश्यक आहे.

पुरेशा झोपेसाठी दोन सराव महत्त्वाचे

1. स्क्रीन टाइम कंट्रोल करा

सेल फोन, संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसमधून शॉर्ट व्हेवलेंथचा प्रकाश उत्सर्जित केला जातो. हा ब्ल्यू लाईट संध्याकाळी झोप आणणाऱ्या हार्मोन मेलाटोनिनचे काम करतात. ही स्लो व्हेव्ह REM च्यावेळीही कार्यरत असते.

2. ब्रीदिंगचे 4-7-8 तंत्र अवगत करा

या तंत्रासाठी आरामदायक जागेवर झोपा. जीभेला टाळूला लावा. ओठ उघडून शिट्टी वाजवण्यासारखा आवाज करून श्वास पूर्णपणे तोंडावाटे बाहेर फेका. आता ओठ बंद करा. मस्तकातून चारपर्यंत मोजता मोजता नाकाद्वारे श्वास घ्या. सात सेकंद श्वास रोखून धरा. आठव्या सेकंदानंतर पूर्वीसारखाच आवाज काढत श्वास तोंडावाटेबाहेर फेका.

झोपेचे 4 चक्र, शेवटची दोन चक्रं शरीराच्या रिकव्हरीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

पहिले चक्र: नॉन रॅपिड आय मूव्हमेंट म्हणजे NREM स्टेज 1- तुम्ही झोपल्याबरोबर ही अवस्था सुरू होते। ही स्टेज जवळपास 20 मिनटे असते.

दुसरे चक्र: NREM स्टेज 2 – झोपेचा हा अवधी रात्रभराच्या झोपेच्या 50% असतो. या अवस्थेत मेंदू स्लो व्हेव्स अथवा डेल्टा तरंगांना सोडतो.

तिसरे चक्र: NREM स्टेज 3 – झोपेच्या या स्टेजला ‘घोर झोप’ म्हटलं जातं. शरीराची रिकव्हरी आणि विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.

चौथे चक्र: रॅपिड आय मुव्हमेंट म्हणजे REM- झोपच्या या अवस्थेत सर्व मांसपेशी रिलॅक्स होतात. यात श्वास अनियमित असतो. स्वप्नं सुरू होतात. हा आपल्या झोपेचा शेवटचं आणि महत्त्वाचं चक्र असतं. (Health: Deep Sleep Reduce Obesity By 50% And Depression By 90%)

 

संबंधित बातम्या:

गरोदरपणात ऑफिसला जात आहात? मग ‘या’ 3 टिप्स नक्की फाॅलो करा!

कमरेच्या चरबीमुळे मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका; वाचा बेली फॅट कमी करण्याचे पाच सोपे उपाय!

Vitamin B12 Deficiency : शरिरासाठी व्हिटॅमिन बी 12 महत्वाचे शाकाहारी लोकांनी त्याची कमतरता कशी दूर करावी, वाचा याबद्दल सविस्तर!

(Health: Deep Sleep Reduce Obesity By 50% And Depression By 90%)