चुकीचा आहार पद्धती, बदललेली जीवनशैली आणि नियमितपणे व्यायाम ( Exercise tips ) न कळल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. यामुळे अनेक आजार आपल्या शरीराला घेरतात. घातक आजारांपैकी एक समस्या आहे ती म्हणजे थायरॉईड( Thyroid issue ) . ही समस्या झाल्यास आपले वजन वाढू ( weight loss in thyroid ) लागते किंवा कमी होते. अनेकदा हार्मोन्स मध्ये बदल सुद्धा होतात. जर या आजारावर योग्य वेळी उपचार केले नाही तर भविष्यात हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. तज्ञ मंडळींच्या मते गळ्यातील थायरॉईडच्या ग्रंथी वाढल्यामुळे हा आजार उद्भवतो. या ग्रंथीमुळे शरीरातील विविध अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. तसे पाहायला गेले तर थायरॉईड ग्रंथी टि 3 आणि टी 4 थायरोक्सिन हार्मोन निर्माण करतात ज्यामुळे आपल्या श्वासाची गती,हृदय हालचाल, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर देखील परिणाम होतो.सोबतच हाडे, मांसपेशी व कोलेस्ट्रॉल यांना देखील नियंत्रित करते. जर आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो. या आजारावर सहजच मात देखील करता येते. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, या पदार्थांचे रस सेवनाने तुमच्या शरीरातील थायरॉइड नियंत्रणात येईल.हे पदार्थ म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत चला तर मग जाणून घेऊया या बद्दल…
हा रस बनवण्यासाठी आपल्याला सफरचंद आणि लिंबू आवश्यकता लागेल, यासाठी जलकुंभी चे पान आणि मुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन मिक्सरच्या सहाय्याने पेस्ट बनवायची आहे,आता या पेस्टमध्ये सफरचंदाचे तुकडे टाकायचे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे. पुन्हा आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे, आता आपल्याला गाळणी च्या सहाय्याने याचा रस काढायचा आहे,अशा प्रकारे हा रस योग्य मात्रांमध्ये सेवन केल्यास तुम्हाला थायरॉईडच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल. हा रस नियमितपणे सेवन केल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहील.
गाजर आणि बीट हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. या दोन्ही पदार्थांपासून तयार केलेला रस खूपच चविष्ट असतो. या दोन्ही पदार्थांचे रस बनवण्यासाठी आपल्याला एक गाजर एक बीट व एक सफरचंद लागेल. आता हे तिन्ही पदार्थ फळ व्यवस्थित कापून मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि याचा जो रस निघेल याचे सेवन आपल्याला करायचे आहे. हा रस आपण नियमितपणे प्यायल्यास तुमचा थायरॉइड नियंत्रणात राहील. शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण झाली असेल तर लोहाची कमतरता भरून निघेल.
हा रस बनवण्यासाठी आपल्याला चांगली छोटीशी दुधी घ्यायची आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून पुदिना आणि काळे मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. हे मिश्रण मिक्सर मध्ये टाकून बारीक पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे हा रस तयार होईल. हा रस प्यायल्याने तुमच्या शरीरातील थायरॉईड कमी होणार आहे पण त्याच बरोबर अतिरिक्त वाढलेले वजन सुद्धा नियंत्रणात येईल. उपाशीपोटी हा रस प्यायल्याने दिवसभर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील.
इतर बातम्या
मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं : अजित पवार