Lemon Tea: लेमन टी पिणं आहे खूप फायदेशीर, जाणून घ्या फायदे अन् आजच प्यायला सुरूवात करा…

| Updated on: Aug 21, 2022 | 3:26 PM

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Lemon Tea: लेमन टी पिणं आहे खूप फायदेशीर, जाणून घ्या फायदे अन् आजच प्यायला सुरूवात करा...
Follow us on

मुंबई : हल्ली अनेकजण लेमन टी पिताना दिसतात. पण लेमन टीचे आरोग्यासाठी फायदे आहेत का? असतील तर काय? त्याची चर्चा अनेकदा होते. त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेकजण तंदुरुस्तीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी सकाळी नियमितपणे लिंबू पाणी पितात. लिंबू दिवसभर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. मसाला चहा किंवा अद्रक चहा ऐवजी जर लेमन टीचा आपल्या आहारात समावेश केला तर ते फायदेशीर आहे. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे शरिराची पचनक्रिया व्यवस्थित राहाते. यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी असतं. शिवाय या चहामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लेमन टीचा आहारात समावेश करण्याचे फायदे काय आहेत? जाणून घेऊया….

पचनक्रिया सुधारते

लेमन टीमुळे पचनक्रिया सुधारते. लेमन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे शरीरातील अनावश्यक पदार्थ काढून टाकण्याचं काम करतं. त्यामुळे वाढती चरबी कमी होण्यास मदत होते. लेमन टीने शरीर दिवसभर हायड्रेट राहते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी फायदेशीर आहे. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. शरीरातील लोहाची कमतरता टाळण्यासाठी हे काम करते. हे हाय ब्लड प्रेशरचा धोकाही टाळते. त्यामुळे हार्ट अटॅकपासून संरक्षण होतं.

हे सुद्धा वाचा

मळमळण्यापासून सुटका

लेमन टीमध्ये आलं घातल्यास ते अधिक फायदेशीर राहातं. आलं मळमळण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करतं. सांध्यांच्या समस्येसाठीही हे फायदेशीर आहे. एनर्जी लेव्हल वाढण्यासही मदत होते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहाते.

कॅलरीजचे सेवन

लेमन टीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. कारण त्यात दूध आणि साखर नसते. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यासही मदत होते.

डिटॉक्स

लिंबात सायट्रिक अॅसिड असतं. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे शरीर डिटॉक्स होतं.

(कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)