Heart Attack पासून स्वतःचा बचाव कसा करायचा? वाचा

| Updated on: Feb 27, 2023 | 12:13 PM

सुपरफूड आपल्या हृदयाचे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. लहान वयातच तुम्ही हे खायला सुरुवात केलीत, तर वयाच्या चाळीशीनंतर हृदयविकार होणार नाही.

Heart Attack पासून स्वतःचा बचाव कसा करायचा? वाचा
heart attack
Image Credit source: Social Media
Follow us on

हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. विशेषतः आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सुपरफूड्स असे पदार्थ आहेत ज्यात उत्तम पौष्टिक मूल्य आहे आणि आपल्या शरीरास खूप फायदा होतो. सुपरफूड आपल्या हृदयाचे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. लहान वयातच तुम्ही हे खायला सुरुवात केलीत, तर वयाच्या चाळीशीनंतर हृदयविकार होणार नाही.

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ

धान्य

वेगवेगळी धान्य आपल्या शरीरासाठी आणि विशेषत: हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. हे धान्य हृदयाचे सामान्य बिघाडापासून संरक्षण करते. तांदूळ, नाचणी, जवस,मका, ओट्स, बाजरी, गहू यासारखे पदार्थ रोजच्या जेवणात असल्यास हृदयविकारापासून आपला बचाव होऊ शकतो. आहारात या धान्यांना प्राधान्य द्यायलाच हवं.

डार्क चॉकलेट

तुम्ही नॉर्मल चॉकलेट भरपूर खाल्ले असेल, पण हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आतापासूनच डार्क चॉकलेट खाण्यास सुरुवात करा. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ही गोष्ट खाल्ल्याने आपले शरीर आणि हृदय आपल्या आजूबाजूला असलेल्या विषारी पदार्थांपासून सुरक्षित राहते. डार्क चॉकलेटमध्ये हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी महत्त्वाची खनिजे असतात.

चरबीयुक्त मासे

सॅल्मन आणि ट्यूना सारखे चरबीयुक्त मासे प्रथिने आणि निरोगी चरबीचे समृद्ध स्त्रोत आहेत. शरीराला विविध कामांसाठी प्रथिनांची गरज असते. यासह, निरोगी चरबी आपल्या शरीरास योग्यरित्या कार्य करण्यास आणि आवश्यक जीवनसत्त्वे शोषून घेण्यास मदत करते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. इतर स्वयंपाकाच्या तेलांमुळे कोरोनरी रोग होण्याचा धोका वाढू शकतो, तर ऑलिव्ह ऑईल ते कमी करण्यास मदत करू शकते. जे लोक त्यांच्या दैनंदिन आहारात ऑलिव्ह ऑईल वापरतात त्यांच्या हृदयाच्या आरोग्यात सुधारणा दिसून आल्या आहेत.