Health tips : मधुमेह (Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे. मधुमेहाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसे न केल्यास तुमच्या शरीरामध्ये मधुमेहामुळे इतर देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. खाण्या-पिण्याची चुकीची पद्धत, नियमित व्यायाम न करणे, आरामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस मधुमेह अथवा शुगरचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊन,मोठ्या प्रमाणात वाढते. अॅलोपॅथी उपचारांसोबतच काही घरगुती उपायांचा अवलंब करून देखील तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहाराची (Diabetes Diet) विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. असे काही पदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास (Diabetes care) तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहेत.
मेथीमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मेथी पावड घ्या, या पावडरचे नियमित कोमट पाण्यासोबत सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मेथीमध्ये फायबर असते, त्यामुळे तुमच्या पचनाचा वेग कमी होतो. मेथीमध्ये असे काही गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तातील साखर शोषली जाते.
दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच, सोबतच दालचिनिच्या नियमित सेवनामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण देखील नियंत्रणात राहाते. दालचिनीमध्ये काही बायोएक्टिव्ह घटक असतात ते तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसातून एकदा तरी एक चमचा दालचिनीची पूड कोमट पाण्यातून घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
आवळ्याचा रस हा मधुमेहावर रामबाण इलाज आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचे खनिज असते जे कार्बोहायड्रेट्स नियंत्रित करण्यास मदत करते आणि तुमचे शरीर इन्सुलिनला अधिक प्रतिसाद देते. यासाठी दररोज 2 चमचे आवळ्याचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून सकाळी लवकर प्या. असे केल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.
कारल्याच्या रसाचे दररोज सेवन करणे ही एक अवघड गोष्ट आहे. परंतु तुम्ही जर दररोज कारल्याच्या रसाचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कधीही वाढणार नाही. कारले ही एक कडू फळ असल्यामुळे तुम्हाल कारल्याचा रस नुसता पिणे शक्य होणार नाही. त्यामुळे एक कच्चे सफरचंद घ्या मिक्सरमध्ये त्याचे ज्यूस तयार करा, कारल्याचे ज्यूस त्यामध्ये मिक्स करा आणि दोन्ही मिक्स ज्यूस प्या. हा उपाय नियमित केल्यास तुम्हाला मधुमेहा सारख्या आजारांपासून आराम मिळू शकतो.
टीप : वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, तुम्ही कुठलेही उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!
खरंच सीटीस्कॅनमध्ये खराब झालेलं फुफ्फुस दिसत नाही? असं घडल्यास नेमके काय करावं
कोरोनातून बरे झाल्यानंतर पल्मोनरी फायब्रोसिस होऊ शकतो, प्रकार काय आणि उपचार काय?