मुंबई : लठ्ठपणा कमी करुन आपले वजन नियंत्रीत (Weight Loss) करणे आज सर्वात मोठे आव्हान आहे. अनेक जण वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी महागडे उपचार घेतात. त्यासोबतच तासंतास जीममध्येही घालवतात. परंतु वजन कमी करण्यासाठी योग्य व पुरक आहार नसल्याने अनेकांचे वजन कमी होत नाही. किंवा त्यांना जेवढ्या लवकर अपेक्षीत आहे, तेव्हढ्या लवकर ते नियंत्रणात येत नाही. परिणामी नंतर व्यक्ती वजन कमी करण्याचा विचारच सोडून देते. कोरोनाच्या (corona) काळात बहुतांश लोकांना वजन वाढीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आपण घेत असलेला रात्रीचा आहार वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. अनेक वेळा आपण रात्री जास्त खातो आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे आपले वजन वाढते. म्हणूनच रात्री हलके खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे चांगली झोप तर येतेच, पण हलकेही वाटते. यासोबतच तुम्ही अशा काही पेयांचा (drinks) आहारात समावेश करू शकता, ज्यामुळे तुमचा ‘मेटाबॉलिक रेट’ वाढण्यास मदत होईल. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.
दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अर्धा चमचा दालचिनी पावडर एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करू शकता. चव वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि मध घालू शकता. याचे नियमितपणे रिकाम्या पोटी सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याच्या पाण्याचेही सेवन करू शकता. हे पाणी बनवण्यासाठी तुम्ही जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवू शकता. हे पाणी जिऱ्यातील पोषक तत्वे शोषून घेते. पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात अँपल सायडर व्हिनेगरचा समावेश करू शकता. यासाठी एक कप गरम पाण्यात एक चमचा अँपल सायडर व्हिनेगर मिसळून त्याचे सेवन करा. त्यात अँसिटिक अँसिड असते. हे शरीरातील चयापचय दर वाढवून शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी अनेकांकडून ‘ग्रीन टी’चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ‘ग्रीन टी’ पचनक्रिया गतिमान करते. त्यात ‘कॅटेचिन’ असतात. हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे. लिंबू मिसळून ‘ग्रीन टी’ पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचा चहा देखील घेऊ शकता. यासाठी एक चमचा मेथी एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याचे पाणी गाळून वेगळे करा. हे पाणी हलके गरम करून प्या.
संबंधित बातम्या :
वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा दररोजच्या आहारात समावेश करा!
वजन कमी करायचे आहे? तर या ‘पाच’ सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे
Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या