Pregnancy Care : प्रत्येक महिलेला आई व्हावे असे वाटत असते तसेच आईपणाचा हा प्रवास अत्यंत सुखद असतो. गर्भधारणा झाल्यानंतर महिलेची डिलिव्हरी होईपर्यंत विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. उठल्या बसण्यापासून ते खाण्यापिण्याच्या सगळ्या सवयी व्यवस्थित पार पाडाव्या लागतात. प्रत्येक गोष्टीबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. बाळाला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये याबद्दल सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो आणि भविष्यात बाळाचे (Baby) आरोग्य व आईचे आरोग्य कसे चांगले राहील या अनुषंगाने प्रत्येक पाऊल उचलावे लागते. गरोदरपणाच्या (Pregnancy) काळामध्ये साधारणत: लोह, कॅल्शियम ,विटामिन ,प्रोटीन इत्यादीने भरपूर पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला गर्भवती महिलेला दिला जातो. जेणेकरून गर्भामध्ये वाढणारे बाळ सदृढ राहील. या सगळ्या दरम्यान काही पदार्थ खाऊ नये याबद्दल सुद्धा सांगितले जाते जेणेकरून भविष्यात गर्भपाताची (Miscarriage) घटना घडू नये. जर तुम्हीसुद्धा गरोदरपणाच्या या चांगल्या काळातून जात असाल तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय मोलाची ठरणार आहे म्हणूनच आज आपण गरोदरपणाच्या काळामध्ये नेमके कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
गरोदरपणाच्या काळात चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ
गरोदरपणाच्या काळामध्ये पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो विशेष करून जर पपई कच्ची असेल तर ती अजिबातच खाऊ नये, तसे पाहायला गेले तर कच्च्या पपई मध्ये पपेन नावाचे एक तत्व असते जे आपल्या शरीरातील गर्भात वाढणाऱ्या बाळाला(Baby) जन्मजातच दोष आणि अन्य प्रकारचे समस्या निर्माण करतात सोबतच या घटक तत्त्वामुळे गर्भपात (Miscarriage) होण्याची शक्यता सुद्धा वाढते परिणामी बाळाच्या जीवाला धोका उद्भवतो.
तसे तर मासे आपल्या शरीरासाठी खाणे अतिशय उत्तम मानले गेलेले आहे.नियमीत मासे खाल्ल्याने विटामिन डी ,प्रोटीन ,ओमेगा फेट्टी ऍसिड,ईपीए आणि डीएचए सारखे पोषक घटक तत्व आपल्या शरीराला प्राप्त होतात परंतु बहुतेक वेळा अशुद्ध पाण्यामध्ये राहिल्यामुळे आणि अन्य जिवांना अनेकदा खाल्ल्यामुळे माशांच्या शरीरामध्ये पारा शिरतो अशावेळी हा पारा माशांच्या मांस पेशी मध्ये जमा होऊन जातो आणि माशांना शिजवल्यानंतर सुद्धा हा पारा त्यांच्या शरीरातून बाहेर निघत नाही अशातच जर गर्भवती महिलांनी मासे खाल्ले तर यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणूनच गरोदरपणाच्या काळामध्ये चुकून सुद्धा मासे खाऊ नका.
गरोदरपणाच्या काळामध्ये चुकूनसुद्धा कच्ची अंडी सेवन करू नका यामुळे सैल्मोनेला संक्रमणाचा धोका वाढतो या कारणामुळे मळमळ होणे, पोट दुखी, जुलाब, उलटी यासारख्या समस्या उद्भवतात.
सर्दी खोकला कफ झाल्यावर अनेकदा महिला तुळशीची चहा बनवून पितात किंवा अन्य प्रकारे तुळशीच्या पानांचे सेवन करत असतात परंतु गरोदरपणाच्या काळामध्ये असे अजिबात करू नका. तुळशीच्या पानांमध्ये एस्ट्रोगोल नावाचे घटक पदार्थ असतात यामुळे महिलांच्या शरीरातील गर्भपाताचा धोका अधिक वाढून जातो.
ज्या पदार्थांमध्ये जास्त कॅलरी समाविष्ट असतात असे पदार्थ खाल्ल्याने महिलांचे वजन वाढते पण त्याचबरोबर गरोदरपणाच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच गुंतागुंत सुद्धा वाढते. आणि हेच कारण भविष्यात गर्भपाताचा धोका सुद्धा उद्भवू शकतो म्हणूनच या काळात दरम्यान महिलांनी कमी शिजवलेले मांस, सीफूड, प्रक्रिया केलेले मांस, जास्त तळलेले व भाजलेले मांस खाऊ नये.
(टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा)
संबंधित बातम्या :
खरोखरच सर्दी आणि खोकल्याच्या वेळी पेरू खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे? जाणून घ्या महत्वाची माहीती!
हिवाळ्यात तूप खाण्याचे “हे” आहेत फायदे… अतिलठ्ठपणा अजिबात नाही वाढणार!