मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उठल्यावर मळमळ, उलटी आणि डोकेदुखी यासारख्या समस्या. या समस्या गर्भधारणे दरम्यान महिलांमध्ये जास्त प्रमाणात उद्भवतात. परंतु काही वेळा त्या मागील कारणे भावनिक ताण, सतत प्रवास करणे, जास्त थकवा रात्रीचे जेवण उशिरा खाणे किंवा जड अन्न खाणे हे असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची दिनचर्या सुधारली पाहिजे. कारण सतत मळमळ आणि उलट्यांमुळे वजन कमी होऊ शकते आणि शरीरात इलेक्ट्रोलाईटची कमतरता देखील असू शकते. जे आरोग्यासाठी चांगले नाही. तुमची दिनचर्या सुधारण्या व्यतिरिक्त काही घरगुती उपाय तुम्हाला सकाळच्या या आजारापासून आराम देऊ शकता.
जर तुम्हाला सकाळी उलटी, मळमळ, डोकेदुखी होत असेल तर भरपूर पाणी प्या आणि चांगली झोप घ्या. याशिवाय जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या अर्धा तासानंतर पाणी प्या. मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. तसेच सर्व पदार्थ एकाच वेळी खाण्याऐवजी काही तासांच्या अंतराने कमी प्रमाणात खा. याशिवाय मॉर्निंग सिकनेसच्या वेळी कोणत्या गोष्टी तुम्हाला आराम देऊ शकतात हे जाणून घेऊ.
जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसची समस्या असेल तर आले तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. एक कप पाण्यात ठेचलेले आले घालून उकळवा. गाळल्यानंतर त्यात थोडे लिंबू टाकून प्या. यामुळे काही वेळात उलट्या आणि मळमळल्यापासून आराम मिळेल. डोकेदुखी पासून आराम मिळवून देण्यासाठी ही हा प्रभावी उपाय आहे.
गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस होत असेल तर त्यावर आराम मिळवण्यासाठी लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचा वास घेतल्याने आराम मिळतो. जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेस असेल तर तुम्ही यापैकी फळ तुमच्या सोबत ठेवू शकता. याशिवाय लिंबूवर काळे मीठ टाकून खाल्ल्याने मॉर्निंग सिकनेस पासून आराम मिळतो.
बडीशेप पचनासाठी खूप चांगली असते. त्यामुळे जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होत असेल तर बडीशेप उकळून त्याचे पाणी प्या किंवा तुम्ही बडीशेप चघळू शकता. यामुळेही आराम मिळतो आणि ॲसिडिटी, मळमळ यासारख्या समस्या होत नाहीत. बडीशेप अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असल्याने आरोग्यासाठी इतर फायदे देखील देते.
जर तुम्हाला सकाळी उलट्या आणि मळमळ होत असेल तर जास्त वेळ रिकाम्या पोटी न राहण्याचा प्रयत्न करा. याशिवाय तुम्ही हिरवी वेलची थोड्यावेळ दाताखाली ठेवून चावू शकता. यामुळे देखील आराम मिळतो.