पांढरे केस पुन्हा काळे करा, अगदी घरगुती पद्धतीने!

| Updated on: Jul 08, 2023 | 2:43 PM

केमिकलयुक्त हेअर डाईचा वापर केला जातो, पण यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केस काळे करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही, तुम्ही नैसर्गिक पद्धतीने पांढरे केस पुन्हा काळे करू शकता. जाणून घेऊयात केसांचा काळेपणा परत आणण्यासाठी कोणती गोष्ट वापरली जाते.

पांढरे केस पुन्हा काळे करा, अगदी घरगुती पद्धतीने!
white hair problems
Follow us on

मुंबई: सध्याच्या युगात पांढऱ्या केसांची समस्या इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येक वयोगटातील लोक याला बळी पडत आहेत. लहान वयातच केस पिकल्यामुळे अनेक जण तणावाला आणि कमी आत्मविश्वासाला बळी पडतात. यासाठी केमिकलयुक्त हेअर डाईचा वापर केला जातो, पण यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केस काळे करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही, तुम्ही नैसर्गिक पद्धतीने पांढरे केस पुन्हा काळे करू शकता. जाणून घेऊयात केसांचा काळेपणा परत आणण्यासाठी कोणती गोष्ट वापरली जाते.

पांढरे केस पुन्हा काळे कसे करावे

  1. मेथीदाणे रात्री पाण्याने भरलेल्या भांड्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट तयार करून डोक्यावर लावा, असे काही दिवस केल्यास पांढरेपणा जाईल.
  2. मेथीच्या औषधी गुणधर्मांबद्दल अनेकदा चर्चा केली जाते, जर तुम्हाला तुमचे केस पुन्हा काळे करायचे असतील तर 2 चमचे मेथीदाणे पाण्यात उकळून थंड करा. आता या पाण्याने केस धुवून घ्या.
  3. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेथीचा भरपूर वापर केला जातो, जर तुम्हीही या मसाल्यासोबत गुळाचे सेवन केले तर पांढऱ्या केसांची समस्या लवकर दूर होईल. याशिवाय केसगळती रोखण्यासाठीही मेथी अतिशय प्रभावी आहे.
  4. मेथीदाणे बारीक करून पावडर तयार करा, आता त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. यामुळे लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल.
  5. नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते, यासोबतच मेथीचे दाणे बारीक करून डोक्यावर लावल्यास केस पांढरे तर होतीलच, पण केस गळणे आणि कोंडा यापासूनही मुक्ती मिळेल.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)