मुंबई : नियमित चांगला आहार (Diet) आणि व्यायामाने वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज वापरता आणि किती कॅलरीज बर्न करता हे महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही किती अन्न खात आणि तुम्ही किती बर्न करू शकता याचे गणित जर तुम्हाला एकदा समजले तर वजन कमी (Weight loss) करणे अधिक सोपे होते. जर आपण सतत खात राहिलो आणि कॅलरीज (Calories) अजिबात बर्न केल्या नाहीतर आपले वजन वाढते. सोबत मधाचा देखील आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश करायला हवा. कारण मध हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. जर आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून पिला तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेपासून ते वजन कमी करण्यापर्यंत मध खूप जास्त फायदेशीर आहे. मधातील ब्रोक्टोज आपल्याला हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. मधामध्येही खूप जास्त खनिजे आहेत. जिरे पाण्यात उकळा आणि त्यात एक चमचा मध आणि चार तुळशीची पाने मिसळा आणि प्या. या खास पेयामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबत ते वजन कमी करण्यासही मदत करते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा दालचिनी पावडर मधात मिसळून प्या. यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि वजन कमी होईल. जर तुम्ही ग्रीन टीमध्ये दालचिनी मिसळू शकता, तर चयापचय देखील वाढेल. विशेष म्हणजे या खास पेयामुळे आपले वजनही झटपट कमी होण्यास मदत होईल.
लसणात अनेक गुणधर्म आहेत आणि हे लसूण वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. कच्च्या लसणाच्या दोन पाकळ्या एक चमचा मधासोबत चावून खा. यामुळे पचनक्रिया चांगली होईल. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या, उच्च रक्तदाब यासह अनेक समस्या दूर होतील.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)