पायऱ्या चढताना खूप दम लागतो का ? काय केलं पाहिजे?

| Updated on: Feb 25, 2023 | 1:33 PM

लोक आतून कमकुवत होऊ लागले आहेत. त्यामुळेच लोक पायऱ्या चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करणे पसंत करतात, कारण दोन-चार पायऱ्या चढताच त्यांचा श्वास फुगायला लागतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात.

पायऱ्या चढताना खूप दम लागतो का ? काय केलं पाहिजे?
tired while going upstairs
Image Credit source: Social Media
Follow us on

धावपळ आणि व्यस्त जीवनात बहुतांश लोक आपल्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. ज्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. सध्याच्या युगात जंक फूड खाणे आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे म्हणजेच व्यायाम न करणे या सगळ्यामुळे लोक आतून कमकुवत होऊ लागले आहेत. त्यामुळेच लोक पायऱ्या चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करणे पसंत करतात, कारण दोन-चार पायऱ्या चढताच त्यांचा श्वास फुगायला लागतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात.

पायऱ्या चढताना खूप दम लागतो का ?

अनेकदा असं होतं की काही पायऱ्या चढताच आपण दमायला लागतो, हे अजिबात नॉर्मल लक्षण नाही, त्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरात पोषक तत्व आणि ऊर्जेची कमतरता. मात्र अनेकदा पोषक तत्व मिळाल्यानंतरही शरीराची थोडीशी हालचाल झाली तरी लोक थकतात, हे ही आजाराचे लक्षण असू शकते.

‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

जर तुम्ही थोड्या पायऱ्या चढून थकत असाल तर हे कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण नाही, परंतु काही लोकांसाठी ते खूप धोकादायक देखील असू शकते. अशावेळी पायऱ्या चढताना थकवा येत असेल तर खाली दिलेल्या काही गोष्टींची काळजी घ्यावी.

  • आपल्या शरीराचे वजन नॉर्मलपेक्षा जास्त होऊ देऊ नका.
  • झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
  • दररोज पूर्ण झोप घ्या आणि दिवसा झोपण्याची सवय टाळा.
  • सकस आहार घ्या आणि केवळ पोषक आहार घ्या.
  • नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं, व्यायाम करा.

समस्या कायम राहिल्यास काय करावे?

हे सर्व केल्यानंतरही लवकर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे क्रोनिक फैटीग सिंड्रोमचे (Chronic Fatigue Syndrome) लक्षण देखील असू शकते.